रविवार, २९ ऑक्टोबर, २०१७
आत्महत्या
उरी सतत चिंता घेऊन जगणाऱ्या बळीराजाच्या आक्रोशाची ओळख करून देणाऱ्या एका #संहितेतील भावनांना कवितेत मांडण्याचा प्रयत्न पुढील #आत्महत्या कवितेत केला आहे...
#आत्महत्या
अशीच आवस्था आमची
आभाळासबी दया वाटंना,
भुईला नाही थोडसं पाणी
शेतामधी पण पिक येईना !
भोग कसले वाट्यास ईथं
मनी मरणाचा पिंगा घुमतो,
यातना ह्या सोसता सोसता
आत्महत्येचाच ईचार येतो!
'अज्ञानात सुख हाय म्हणं'
आमीबी ठाई ठाई ऐकलय,
शिक्षाण घेऊन काय झालं?
दारिद्र्यच वाट्याला आलयं!
आता तरी काढा हो झापडं
डोळ्यांवरची ती पांघरलेली,
जाण ठेवा तुम्ही सरकार हो
व्यवस्था बळीनं सावरलेली!
©शिवाजी सांगळे 🦋 २६-१०-२०१७
#आत्महत्या
अशीच आवस्था आमची
आभाळासबी दया वाटंना,
भुईला नाही थोडसं पाणी
शेतामधी पण पिक येईना !
भोग कसले वाट्यास ईथं
मनी मरणाचा पिंगा घुमतो,
यातना ह्या सोसता सोसता
आत्महत्येचाच ईचार येतो!
'अज्ञानात सुख हाय म्हणं'
आमीबी ठाई ठाई ऐकलय,
शिक्षाण घेऊन काय झालं?
दारिद्र्यच वाट्याला आलयं!
आता तरी काढा हो झापडं
डोळ्यांवरची ती पांघरलेली,
जाण ठेवा तुम्ही सरकार हो
व्यवस्था बळीनं सावरलेली!
©शिवाजी सांगळे 🦋 २६-१०-२०१७
धडपड
एका मित्राच्या विनंती नुसार "नोकरी गेलेला, बेकारीला कंटाळलेला व एका मुलीचा पिता असलेला तरूण मुलीच्या भविष्यासाठी नाईलाजाने तृतीयपंथी असल्याचे सोंग करतो... व पकडला जातो"
या प्लाँटवर आधारित एक छोटी #संहिता व तीला पुरक अशी पुढील #धडपड कविता लिहून देण्याचा योग आला...
छान वाटतयं...
#धडपड
असुनही मी पुरुष सुद्धा
ईच्छा नाहीच हो माझी,
कपडे बाईचे अंगी वापरणं
सवय नाहीच हो माझी !
नका हेटाळू तुम्ही मला
पोटासाठी धडपड माझी,
दु:ख वाट्यास मुलीच्या
न येवो कधी ईच्छा माझी !
शिक्षण, नोकरी, आरोग्य
सर्वांस प्राप्त आस माझी,
मिळो सर्वांना सुखशांती
हीच प्रार्थना आहे माझी !
#शिवाजी_सांगळे© 🦋 २६-१०-२०१७
या प्लाँटवर आधारित एक छोटी #संहिता व तीला पुरक अशी पुढील #धडपड कविता लिहून देण्याचा योग आला...
छान वाटतयं...
#धडपड
असुनही मी पुरुष सुद्धा
ईच्छा नाहीच हो माझी,
कपडे बाईचे अंगी वापरणं
सवय नाहीच हो माझी !
नका हेटाळू तुम्ही मला
पोटासाठी धडपड माझी,
दु:ख वाट्यास मुलीच्या
न येवो कधी ईच्छा माझी !
शिक्षण, नोकरी, आरोग्य
सर्वांस प्राप्त आस माझी,
मिळो सर्वांना सुखशांती
हीच प्रार्थना आहे माझी !
#शिवाजी_सांगळे© 🦋 २६-१०-२०१७
सोमवार, २३ ऑक्टोबर, २०१७
हायकू १९९-२०१
शुक्रवार, २० ऑक्टोबर, २०१७
ताटातलं भांडण
उमजले का कुणाला
सोमवार, १६ ऑक्टोबर, २०१७
हायकू १९६-१९८
शनिवार, १४ ऑक्टोबर, २०१७
हायकू १९३-१९५
गुरुवार, १२ ऑक्टोबर, २०१७
निभवा दोस्ती
जाळला जात होतो
हायकू १९०-१९२
मंगळवार, १० ऑक्टोबर, २०१७
खरेदी पुलांवरची
रांग
रांग
आयुष्य एक रांग
जन्मा पासून सुरू झालेली,
शेवट ज्ञात असलेली,
शिस्तबद्ध राहण्या
वाचून पर्याय नसलेली...!
सुख दु:खाचे अवरोध
म्हणा किंवा गतिरोधक...!
थांबावं आणि चालावं
लागतच...!
ईच्छा असो वा नसो
अगोदरच
नक्की झालेला प्रवास
कसलीही घाई न करता
फक्त आपण करायचा...!
केवळ ध्यानात ठेवायचं...
काम क्रोध लोभ
मोह मद मत्सर
यांची
शिस्त पाळणं...
चांगल्या प्रवास साठी...!
© शिवाजी सांगळे 🦋
http://marathikavita.co.in/gambhir-kavita/t29646/new/#new
आयुष्य एक रांग
जन्मा पासून सुरू झालेली,
शेवट ज्ञात असलेली,
शिस्तबद्ध राहण्या
वाचून पर्याय नसलेली...!
सुख दु:खाचे अवरोध
म्हणा किंवा गतिरोधक...!
थांबावं आणि चालावं
लागतच...!
ईच्छा असो वा नसो
अगोदरच
नक्की झालेला प्रवास
कसलीही घाई न करता
फक्त आपण करायचा...!
केवळ ध्यानात ठेवायचं...
काम क्रोध लोभ
मोह मद मत्सर
यांची
शिस्त पाळणं...
चांगल्या प्रवास साठी...!
© शिवाजी सांगळे 🦋
http://marathikavita.co.in/gambhir-kavita/t29646/new/#new
शनिवार, ७ ऑक्टोबर, २०१७
हायकू १८७-१८९
गुरुवार, ५ ऑक्टोबर, २०१७
सोमवार, २ ऑक्टोबर, २०१७
हायकू १८४-१८६
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)