सोमवार, २७ नोव्हेंबर, २०१७

हायकू २२८-२३०

#हायकू २३०

छायाचित्र सौजन्य: श्री प्रकाश नेवासकर

#हायकू २२९

छायाचित्र सौजन्य: गुगल

#हायकू २२८

छायाचित्र सौजन्य: श्री प्रकाश नेवासकर

बुधवार, २२ नोव्हेंबर, २०१७

हायकू २२५-२२७

#हायकू २२७

छायाचित्र सौजन्य: गुगल

#हायकू २२६

छायाचित्र सौजन्य: श्री शिवाजी सांगळे

#हायकू २२५

छायाचित्र सौजन्य: गुगल

रविवार, १९ नोव्हेंबर, २०१७

हायकू २२३-२२५

#हायकू २२५


#हायकू २२४


#हायकू २२३
वाऱ्याचा स्पर्श
सळसळली पाने
प्रणय गाणे १७-११-२०१७

शुक्रवार, १७ नोव्हेंबर, २०१७

ठेकेदार



 http://marathikavita.co.in/marathi-kavita-others/t29861/new/#new

हायकू २२०-२२२

#हायकू २२२
जग रहाटी
पासष्टावी ही कला
बोलकी पाटी १६-११-२०१७

#हायकू २२१
उन खेळते
धुक्यातल्या दवाशी
रंगाची नक्षी १६-११-२०१७

#हायकू २२०

छायाचित्र सौजन्य: श्री प्रकाश नेवासकर

आहे... आहे



http://marathikavita.co.in/marathi-kavita-others/t29848/new/#new

बुधवार, १५ नोव्हेंबर, २०१७

तंत्रज्ञान गाथा

तंत्रज्ञान गाथा

अती नेट युगी, होईलच माती !
करावा तो किती, अट्टाहास !!

फेसबुक चँट, ते वाँट्स अँप !
येवु न दे झोप, कुणालाही !!

रात्रंदिन घोर, लाईक कमेंट !
लागे पुर्ण वाट, तब्येतीची !!

निशाचर वारी, कधी तरी बरी !
सकलां विचारी, सुख दु:ख !!

अखंडित डेटा, सर्वांचीच व्यथा !
तंत्रज्ञान गाथा, वदे शिवा !!

© शिवाजी सांगळे 🎭
http://marathikavita.co.in/vidamban-kavita/t29851/new/#new

हायकू २१७-२१९

#हायकू २१९
थंडीचे वारे
लागे उन्हाची आस
थोड्यात पुरे १४-११-२०१७

#हायकू २१८
लेक लाडकी
निघली सासुरासी
डोळ्यात पाणी १३-११-२०१७

#हायकू २१७
निळ्या जळात
उतरला आसमंत
तरंग डोहात १२-११-२०१७

©शिव

मला_वाटते... जबाबदाऱ्या

जबाबदाऱ्या

खांद्यावर हात ठेवणारं घरात कोणी वडिलधारं  नसेल तर आपण फार मोठं, पोक्त झालोत असं उगाच जाणवतं. मग जेव्हा वास्तविक जीवना पेक्षा व्यवहारीक जीवनातल्या लहान मोठ्या सर्व जबाबदाऱ्या अंगावर येउ लागतात तेव्हा ते हळूहळू पटूही लागतं, आणि पुढे पुढे प्रयत्न करून त्या जबाबदाऱ्या निभावल्या पण जातात, परंतु खरी कसोटी तेंव्हा लागते जेव्हा एखादा महत्त्वाचा वा मोठा निर्णय घ्यावा लागतो.

काही जणांना वाटेल त्यात काय नविन आहे? सगळ्यांनाच तर यातून जावं लागतं., बरोबर आहे ते, अशावेळी परीस्थिती तुम्हाला आपोआप बळ व बुद्धी देते, आणि त्यातूनही तुमची वेळ चांगली असेल तर अवघड जबाबदारी सुद्धा व्यवस्थितपणे पार पाडली जाते, निभावली जाते आणि त्यामुळे आत्मविश्वास नक्कीच वाढतो, जरी काही चुकीचं घडलंच तर कैक प्रकारचं नुकसानही वाट्याला येतं, तरीही त्यातुनही एक नवा धडा शिकायला मिळतो, नवा अनुभव मिळतो मोल देवून घेतलेला.

काहिंच्या बाबतीत या जबादाऱ्या फार लवकरच त्यांच्या खांद्यावर पडतात आणि वर उल्लेख केल्या प्रमाणे त्या निभावल्या सुद्धा जातात तसेच काही वेळा फार मोठा अनुभव पण देऊन जातात. असे लोक नंतर पुढील आयुष्यात सहसा धीटपणे व आत्मविश्वासाने जीवन जगतात व आपल्या क्षेत्रात नावलौकीक प्राप्त करून यशस्वी होतात.

#मला वाटते...शिवाजी सांगळे©
३२/१४-११--२०१७ 🦋

सोमवार, १३ नोव्हेंबर, २०१७

आयुष्य

आयुष्य

प्रेमात झोकलेलं
आहे आयुष्य
त्यागाने व्यापलेलं
आहे आयुष्य
न उलगडलेलं कोडं
आहे आयुष्य
जगणं समजलं तर,
सोप आहे आयुष्य
नसमजता जगलो तर,
कठीण आहे आयुष्य
समजून बिघडवलेलं
गणित आहे आयुष्य

©शिवाजी सांगळे 🦋
12-11-2017

शुक्रवार, १० नोव्हेंबर, २०१७

हायकू २१४-२१६

#हायकू २१६
बोचरा वारा
पहाट खेळ सारा
अंगी शहारा १०-११-२०१७

#हायकू २१५
रौद्र थैमान
तरंगते जहाज
दोलायमान ०९-११-२०१७

#हायकू २१४
ऋतूचे रंग
हवेत ये तरंग
मन हो दंग ०८-११-२०१७
©शिव

डोळ्यात तुझ्या

http://marathikavita.co.in/marathi-kavita-others/t29819/new/#new


गुरुवार, ९ नोव्हेंबर, २०१७

मैत्री

मैत्री
मैत्रीत कधी साँरी थँक्स
मुद्दामहून आणू नये,
मोकळेपणाने बोलताना
औपचारिकता पाळू नये !

#शिव©
430/08-11-2017

मौन

मौन
मौनाची बोलकी भाषा
जागवी मनात आशा,
कधी उत्साही आनंद
कधी अबोल निराशा !
#शिव
 429/03-11-2017

हायकू २११-२१३

#हायकू २१३
धुके दाटले
चमके दव बिंदू
एक लोलक
#शिव ०७-११-२०१७

#हायकू २१२
ऋतू गारसा
कवडसा उन्हाचा
हवा हवासा ०६-११-२०१७

#हायकू २११



सोमवार, ६ नोव्हेंबर, २०१७

हायकू २०८-२१०

छायाचित्र सौजन्य: श्री प्रकाश नेवासकर

#हायकू २१०


#हायकू २०९


#हायकू २०८



गुरुवार, २ नोव्हेंबर, २०१७

शहर

शहर

http://marathikavita.co.in/marathi-kavita-others/t29768/new/#new

हायकू २०५-२०७

#हायकू २०७
आल्हाद गंध
दे सुवर्णचंपक
मन प्रसन्न ०१-११-२०१७

#हायकू २०६
दव पहाट
पाखरांचा रियाज
किलबिलाट ३१-१०-२०१७

#हायकू २०५
वाऱ्याचे येणे
हळूवार स्पर्शने
सुरेल गाणे २९-१०-२०१७