शुक्रवार, ७ जून, २०१९

मागोवा

मागोवा

स्मरती विस्मरती अनेक बुजल्या वाटा
खुणा भेटीच्या साऱ्या पुसटल्या जाता

काळवेळ सरता उरतो शब्द भास मागे
अक्षरे जुळता लिहिली जाते प्रेम गाथा

ठरवूनी विसरावे सारे असे जमत नाही
भेट फक्त ऋणानुबंधी स्मरणात आता

वेड वाऱ्याचे अन् नाते गंधाचे फुलांशी 
उमगे सत्य पाखरांसवे हितगुज करता

व्याप कशास ठेवू उगाच ताप कशाला
जगावं बिनघोर नी मुक्त एकांती जाता

वाकुल्या दावी दूर कड्यावर धूसर रांगा
मस्त विहरती घेत मागोवा जळात लाटा

© शिवाजी सांगळे 🎭
मो. ९५४५९७६५८९
http://marathikavita.co.in/marathi-kavita-others/t31789/new/#new

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा