मंगळवार, १० ऑगस्ट, २०२१

हिरवं दान (अष्टाक्षरी)

हिरवं दान

रान हिरवं हिरवं, मनाचं हरते भान
माया हि सृष्टीची, कसं फेडू हे दान 

निळे आभाळ वरती, रानी हिरवी चादर
रंगीबेरंगी फुलांचा, त्याच्या वरती बहर

विविधता किती सारी, भोवती हिरवा रंग
पाचूच्या लकाकण्याने, मन होतसे हे दंग

गोड गाणी पाखरांची, ऐकू येती चोहिकडं
हळव्या मनी तयांच्या, आहे रानाचीच ओढ

उपकार मानु किती, माय धरणी गं तुझे
अगणित अपराध, सोसलेस सर्व माझे

शहाणपण आम्हासी, येउ देत आता तरी
जमुदे करणे माया, आता जरा तुजवरी 

https://marathikavita.co.in/preranadai-kavita/()-33567/new/#new
©शिवाजी सांगळे 🦋papillon
 संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा