काल पाखरे सहज म्हणाली
उंच उडू द्या आम्हा आभाळी
उंचउंच सारे टॉवर हे भोवती
मिळू द्या, जरा हवा मोकळी
कुजन हरवले मुक पाखरांचे
शहरात येथे तिन्ही त्रिकाळी
रखरखीत तप्त सिमेंट रस्ती
लुप्त झाली सारी पाण-तळी
झाडेझुडुपे सर्व गायब झाली
घरट्या गवसेना एक डहाळी
https://marathikavita.co.in/marathi-kavita-others/t37092/new/#new
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा