सोमवार, २६ फेब्रुवारी, २०२४

कोरी वही २५०२२०२४ YQ ०३:२४:४०


























कोरी वही

कोरी राहू लागलीय माझी वही...
तुझी आठवण कमी येते हल्ली
बाकी काही नाही!

वाटेल तुला, असं कसं बोलतो...
पण खरं सांगतो,तु सुद्धा हल्ली
काही बोलत नाही!

कटू आहे, तरी सुध्दा सत्य आहे...
दोघांमध्ये, पहिल्या सारखं प्रेम
आता राहीलं नाही!

©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

रविवार, ४ फेब्रुवारी, २०२४

चेहरे
























चेहरे

आजकाल दिसतात कट्ट्यावर तेच तेच चेहरे
एकमेकांनाच करतात सलाम दुवा तेच ते चेहरे

हुजरेच होऊ लागलेत मक्तेदार सर्वत्र आताशा  
वावडे तरी तयांना आल्यावर, नव-नवीन चेहरे

प्रस्थापित मिरविती झेंडे, आपल्या ठेकेदारीचे
अन् हसून छद्मी न्याहाळती, नवोदितांचे चेहरे

होऊ लागलेत शब्द जुनाट, कंपू, टोळी हल्ली
प्रसंगी असतात, एकाचेच अनेक नकली चेहरे

चालू राहूदेत घोडदौड त्यांची त्यांच्याच प्रांगणी
कळेना नंतर, होतात गायब कुठे हे तेरडी चेहरे

https://marathikavita.co.in/index.php?topic=45241.new#new

©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

शनिवार, ३ फेब्रुवारी, २०२४

येणे जाणे ०३०२२०२४ yq १७:०९:०७
























येणे जाणे

झडणे, पडणे, फिरूनी उगवणे
दान निसर्गाचे, कर्म स्विकारणे

गमजा कुठवर कुणी माराव्या
जमले का कुणा नियती टाळणे

क्षणांक्षणांचा हा आनंद सोहळा
झुळूकीवर वाऱ्याच्या जगून घेणे

वाफ होत नभी मिसळून जाता 
पुन्हा फिरून तीचा पाऊस होणे

ठरवून सारे, चक्राकार येथल्या
ऋतूंचे ही आहे साऱ्या येणेजाणे

©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

तो एक प्रवास ०३०२२०२४ yq ०९:०१:०७

























तो एक प्रवास

मात्र तो एक प्रवास आठवणीतला
कधीकाळी आपण सोबत केलेला

हळव्या निकोप ह्रदयस्थ भावनांनी 
कसा कुणा ठाव मनस्वी जुळलेला

बदलले जरी संदर्भ, गती काळाची 
तरीही उरे तीच वहिवाट जगण्याची

पावलोपावलीचे ठसे ते अस्तित्वाचे
सांगतात गोष्ट त्या केल्या प्रवासाची

गर्दी, शहरात मनात देखील दाटली
एकच प्रश्न,अशी हुरहुर का वाढली?

शोधता, सरते रात्र हल्ली सोबतीला
अन् फिरून आठवांनी वाट काढली

©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९