चेहरे
आजकाल दिसतात कट्ट्यावर तेच तेच चेहरे
एकमेकांनाच करतात सलाम दुवा तेच ते चेहरे
हुजरेच होऊ लागलेत मक्तेदार सर्वत्र आताशा
वावडे तरी तयांना आल्यावर, नव-नवीन चेहरे
प्रस्थापित मिरविती झेंडे, आपल्या ठेकेदारीचे
अन् हसून छद्मी न्याहाळती, नवोदितांचे चेहरे
होऊ लागलेत शब्द जुनाट, कंपू, टोळी हल्ली
प्रसंगी असतात, एकाचेच अनेक नकली चेहरे
चालू राहूदेत घोडदौड त्यांची त्यांच्याच प्रांगणी
कळेना नंतर, होतात गायब कुठे हे तेरडी चेहरे
https://marathikavita.co.in/index.php?topic=45241.new#new
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा