अज्ञात काहूर
मनाला छळतंय...एक काहूर अज्ञात
दडलेलं कुठेतरी खोलवर आत आत
शोधता सापडेना उत्तर या अतर्क्याचे
तरी चालतोच खेळ मनाचा आवेगात
अदृष्य..जाळीदार भविष्य पुढ्यातले
खेळवते, गुंडाळते अस्पष्ट भविष्यात
सोडणे, तोडणे पुन्हा पुन्हा ते जोडणे
सरते का आयुष्य एवढेच करण्यात?
कधी कधी पैलतीराची..लोभस दृश्ये
जोडू पाहती..हळूच त्यांच्या बंधनात
https://marathikavita.co.in/index.php?topic=45262.new#new
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा