रविवार, २९ मे, २०१६
दे धक्का...! सदिच्छा
शनिवार, २८ मे, २०१६
दे धक्का...! कांद्याची हमी
शुक्रवार, २७ मे, २०१६
दे धक्का...! हैप्पी बड्डे
दे धक्का...!
हैप्पी बड्डे
वाढदिवशी शुभेच्छा द्यायच्या
हा तर काँमन शिष्टाचार आहे,
पण "नो शासन ओन्ली भाषण",
असाच विरोधकांचा सुर आहे !
जनमत परीक्षेत पास झाल्यावर
मित्राने हळूच तीर सोडला आहे !
जाहिरातींवरील हजार कोटीचा
"आप"ने हिशोब मांडला आहे !
वयाच्या दुसर्या वर्षी हा प्रताप?
काय वेध घ्यायचा भविष्याचा ?
भलं बुरं तर बोलतीलच सगळे
तरी ठेवा मान तरूण जनमताचा !
© शिवाजी सांगळे 🎭
http://marathikavita.co.in/marathi-vatratika/!-23903/new/#new
गुरुवार, २६ मे, २०१६
दे धक्का...! मेगा हाल
दे धक्का...!
मेगा हाल
मान्य, यंदा उन जरा जास्तचं आहे
माणूस तापतो, तीथं रेल्वेचं काय?
नियमित पणे बिघाड होत असतो
विकली मेगाब्लाँगचं फलित काय?
जीवन वाहिनी सार्या चाकरमान्यांची
अशी अचानक रखडून कशी चालेल?
"प्रभू" आपणच घ्यावी काळजी आता
पावसाळ्यात प्रशासनाचा कस लागेल!
© शिवाजी सांगळे 🎭
http://marathikavita.co.in/marathi-vatratika/!-23888/new/#new
बुधवार, २५ मे, २०१६
दे धक्का...! दाऊदायण
दे धक्का...!
दाऊदायण
कित्तेकदा डझनभर पुरावे देउन
पाकिस्तानवर काही असर नाही,
करतील सुपुर्द शेवटी कंटाळून
म्हणतं,त्याची अाम्हा गरज नाही !
चघळून ठराविक काळा नंतर
उगाच वेधलं जातं जनतेचं लक्ष,
पकडून आणाच त्या दाऊदला
होउन देत एकदाचा सोक्षमोक्ष !
© शिवाजी सांगळे 🎭
http://marathikavita.co.in/marathi-vatratika/!-23879/new/#new
जाता जाता आला
जाता जाता आला...
आज आमच्या कडे तो आला, वा-याची थंड झुळुक घेवुन आला, मला फार सुखद बरं वाटलं, ट्रेन मधे लोक दरवाजा खिडक्या लावुन घेत होते... भिजायच्या भितीने, मी म्हटल त्यांना नका रे अडवू त्याला, परततांना तरी त्याला येवु दया, नाही थांबणार तो आता जास्त काळ.
उतरल्यावर वाटत होतं, थांबेल तो जरासा, पण तोही लहान मुलासारखा आज हट्ट करून होता, कधी कधी हट्टी मुलाचा राग येतो, पण त्याचा नाही आला... कर हट्ट आणि भिजव सा-यांना, तप्त, तृषार्त धरणीला, थोडासा मिळेल दिलासा शेतक-याला. भिजव आमच्या सो काँल्ड काँलिफाईड, वाँटरपार्कच्या पावसात भिजणा-यांना.
एक वेळ होती घरचे लोक म्हणायचे "चल घरी, भिजु नकोस, पडसं होईल..." तरी पण हट्टाने भिजायचो, आता पावसाचा राग येतो, भिजायच सोडून आडोश्याला लपतो.... म्हणतात ना माणुस बदलतो? निसर्ग तसाच रहातो निरागस....
मी वाट पाहीली थोडा वेळ, तो नाही थांबला मग मी पण निघालो त्याच्या सोबत... मनात काही काही आठवत होत...
पाऊस बघ परतीचाआपल्या भेटीस परत आला,गाठले बेसावध मलातुझ्या भेटीचा योग न आला!
= शिवाजी सांगळे, बदलापूर

मंगळवार, २४ मे, २०१६
दे धक्का...! घरघर
दे धक्का...!
घरघर
महसूलमंत्र्यांना कायम घरघर
तसच काहीसं खडसेंच झालं,
एक काय सुटता फोन प्रकरण
जमिनीचं प्रकरण मागे लागलं !
त्यांच कर्तृत्व कितीे यात? न्
विरोधकांचा का हात आहे?
शोधुन पहावचं लागेल त्यांना
स्वकीयांचा का बनाव आहे?
© शिवाजी सांगळे 🎭
http://marathikavita.co.in/marathi-vatratika/!-23876/new/#new
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)