शनिवार, ४ जून, २०१६
वारी
हे सुर्य
येशील का रे ?
येशील का रे ?
आळवणी आर्त ही
ऐकून मज पामराची
तारण्या सृष्टी सारी
पावसा येशील का रे ?
धीर विझल्या स्वप्नांना
बळ थोडं जगण्याला
फेडण्या पांग मातीचे
पावसा येशील का रे ?
सावळ्या नभां सोबती
रिझविण्या काळ्या आईस
करण्या सुजलांम सुफला
पावसा येशील का रे ?
© शिवाजी सांगळे 🎭
http://marathikavita.co.in/marathi-kavita-others/t24044/new/#new
आळवणी आर्त ही
ऐकून मज पामराची
तारण्या सृष्टी सारी
पावसा येशील का रे ?
धीर विझल्या स्वप्नांना
बळ थोडं जगण्याला
फेडण्या पांग मातीचे
पावसा येशील का रे ?
सावळ्या नभां सोबती
रिझविण्या काळ्या आईस
करण्या सुजलांम सुफला
पावसा येशील का रे ?
© शिवाजी सांगळे 🎭
http://marathikavita.co.in/marathi-kavita-others/t24044/new/#new
शुक्रवार, ३ जून, २०१६
दे धक्का...! जळती काडी?
दे धक्का...!
जळती काडी?
पुलगांव पाठोपाठ भिवंडी, नंतर
आता कुलाबा, त्यापुर्वी डोंबिवली!
दुष्काळानं आधीच तापल्या रानी
कशानं हो राज्यभर आग पेटली?
राजकारणातील एक एक ज्वाला
पुन्हा नव्यानं पेटून उठू लागली!
खरचं लागल्या सार्या आगी ?
का जळती काडी कुणी टाकली?
© शिवाजी सांगळे 🎭
http://marathikavita.co.in/marathi-vatratika/!-24025/new/#new
गुरुवार, २ जून, २०१६
दे धक्का...! कट आँफ
दे धक्का...! गरळ
दे धक्का...!
गरळ
इथुन तिथुन सारीच माणसं
विनाकारण गरळ ओकणारी !
तन्मय भट न् न्यूयाँर्क टाईम्सची
बातमी अक्कल पाजळणारी!!
भारतीयाची टिंगलचं करायची
हि पाश्चात्यांची जुनीच खोड आहे !
स्वतःकडे पहावं जरा निरखुन
तुमच्याकडेही उन व पाऊस आहे!!
© शिवाजी सांगळे 🎭
http://marathikavita.co.in/marathi-vatratika/!-24023/new/#new
बुधवार, १ जून, २०१६
नाम
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)