रविवार, १७ जुलै, २०१६

दे धक्का...! कधी कळणार?

दे धक्का...!
कधी कळणार?

बुरहान वाणीला हुतात्मा ठरवुन
म्हणे काळा दिवस पाळणार,
अनेक निष्पाप लोकांचे जीव गेले
हे शरीफला कधी कळणार?

केवळ सुडबुध्दी ठेवुन जगायचं
एवढच त्यांना आहे ठावूक,
नित्य रडगाणं ऐकून त्याच, नेत्यांनो
होवु नका उगीच तुम्ही भावुक!

© शिवाजी सांगळे 🎭

http://marathikavita.co.in/marathi-vatratika/!-24641/new/#new

शुक्रवार, १५ जुलै, २०१६

दे धक्का...! घोटाळ्याची प्रगती


दे धक्का...!
घोटाळ्याची प्रगती

सिंचन घोटाळ्याची प्रगती
कोर्टानेच आता विचारली,
दोन आठवड्यात माहिती द्या
अशी तोंडी सूचना दिली !

पवार, तटकरे पुन्हा एकदा
चौकशीच्या रडारवर येणार,
भुजबळ आधीच अडकले
बाकिच्यांचे काय होणार?

© शिवाजी सांगळे 🎭
http://marathikavita.co.in/marathi-vatratika/!-24636/new/#new

गुरुवार, १४ जुलै, २०१६

दे धक्का...! खड्डे किमया


दे धक्का...!
खड्डे किमया
खड्यांची किमया सारी
ठेकेदार भरतो तिजोरी,
घेते मोडून हाडे नित्य
जनता सामान्य बिचारी!

खड्या भोवती अर्थकारण
लोकप्रतीनिधी त्या कारण,
कर वसुली करूनी सारी
का न हो समस्या निवारण?

© शिवाजी सांगळे 🎭
http://marathikavita.co.in/marathi-vatratika/!-24628/new/#new

बुधवार, १३ जुलै, २०१६

दे धक्का...! अडते ती अडत


दे धक्का...!
अडते ती अडत

आला पावसाळा आता
भाजी पाल्याची भरमार,
होउन पुरवठा मुबलक
स्वस्ताई लवकर येणार !

आशेवर सामान्य जन
कधीचा वाट पहात बसला,
अडत वसुली बंदी मुळे
व्यापारी पण अडून बसला!

© शिवाजी सांगळे 🎭
http://marathikavita.co.in/marathi-vatratika/!-24602/new/#new

मंगळवार, १२ जुलै, २०१६

दे धक्का...! छाटा छाटी


दे धक्का...!
छाटा छाटी

राजकारणात प्रत्येकाला
गाँडफादर हवाच असतो,
जनाधार सुध्दा नसलेला
ईतरांपेक्षा वरचढ ठरतो !

सत्ता टिकवायची असेल तर
डावपेच हे करावे लागतात,
जरी असेल यशस्वी कुणी
त्याचे पंख छाटावे लागतात!

© शिवाजी सांगळे 🎭
http://marathikavita.co.in/marathi-vatratika/!-24585/new/#new

सोमवार, ११ जुलै, २०१६

दे धक्का...! उदात्तीकरण


दे धक्का...!
उदात्तीकरण

महात्मा होतो, पुजला जातो
अतिरेकी व्हा महात्मा व्हाल,
जीवंतपणी पुजले जाणारच
उदात्तीकरणाने शहीद व्हाल!

स्वस्त आहे येथे शहीद होणं
दुश्मन परका होता, काळ गेला,
स्वातंत्र्यात या अस्तित्वा साठी
आपलाच तो, का दुश्मन झाला?

© शिवाजी सांगळे 🎭
http://marathikavita.co.in/marathi-vatratika/!-24580/new/#new

रविवार, १० जुलै, २०१६

दे धक्का...! मुंबईचा टक्का


दे धक्का...!
मुंबईचा टक्का

गेल्या पाच वर्षात मुंबईची
लोकसंख्या वाढली,
परंतु मतदारांची संख्या मात्र
बर्‍यापैकी घसरली !

दक्षिण भागातला सारा मतदार
तर मुंबई सोडूनच गेला!
पश्चिम व पूर्व उपनगरात नक्की
कुणाचा टक्का वाढला?

© शिवाजी सांगळे 🎭

http://marathikavita.co.in/marathi-vatratika/!-24557/new/#new

शुक्रवार, ८ जुलै, २०१६

दे धक्का...! विस्तार वाद


दे धक्का...!
विस्तार वाद

कँबिनेट साठी हट्ट धरायचा, कि
मिळेल त्यात समाधान मानायचे?

वाटेकर्‍याला राज्यमंत्रीपदे देउन
तसेच का त्यांना तिष्ठत ठेवायचे?

मंत्री मंडळ विस्ताराचं काम
सविस्तरपणे आता सुरू आहे,
मंत्रीपदाच्या खुर्ची पासून कुणी
जवळ तर कुणी लांब आहे !

© शिवाजी सांगळे 🎭
http://marathikavita.co.in/marathi-vatratika/!-24529/new/#new

गुरुवार, ७ जुलै, २०१६

दे धक्का...! काँमन दहशतवाद


दे धक्का...!
काँमन दहशतवाद

आंतरराष्ट्रीय स्थिती पहाता
दहशतवाद काँमन झाला आहे,
चिथावणीखोर भाषा ऐकून
इकडे का तो वाढवायचा आहे?

कुणाच्याही बोल बच्चनने
तरूणांनो भडकून जाउ नका,
जातात नेते भांडणे लावून
स्वतःला देशोधडी लावू नका !

© शिवाजी सांगळे 🎭
http://marathikavita.co.in/marathi-vatratika/!-24511/new/#new

बुधवार, ६ जुलै, २०१६

दे धक्का...! काव्य मंत्री


दे धक्का...!
काव्य मंत्री

होणार होणार म्हणता
मंत्रीमंडळात कवी रूजु झाले,
मात्र शपथ घेता घेता
स्वतःचेच नाव विसरून गेले !

लोकसभेत आता दरवेळी
प्रश्नाला उत्तर कवितेतुन मिळेल,
विचारलाच प्रश्न माहिती साठी
तो सुध्दा मग कवितेतच असेल !

© शिवाजी सांगळे 🎭
http://marathikavita.co.in/marathi-vatratika/!-24485/new/#new