रविवार, ६ नोव्हेंबर, २०१६

प्रदुषण


प्रदुषण

धुकं न् धुराचे लोटं विषारी
प्रदुषणाच्या विळख्यात ह्या
मोकळा श्वास इथे कसा
घेईल राजधानी बिचारी ?

=शिव

याचक


याचक

खायला दिलं तर नको म्हणतात,
पैसेच द्या असा आग्रह करतात,
हे तर काही मोहरेच रस्त्यावरचे
बोलावते धनी दुसरेच असतात!
=शिव

बुधवार, २ नोव्हेंबर, २०१६

उपहार


दोष द्यावा कुणा?


दोष द्यावा कुणा?

भासात जगणे म्हणावे
कि जगण्याचा हा भास?
अाश्रित असा का कुणी
परकाच भरवितसे घास !

निरागस काही, काहि
शांत शांत अतिव आत,
नजरेत पाझरे भाव तिव्र
जेंव्हा हृदयी फुटे अकांत !

उरे ना भान जगण्याचे
मरण, ते ही सुधरेना
जन्म, का व्हावा गुन्हा?
दोष द्यावा तो कुणा ?
© शिवाजी सांगळे 🎭
http://marathikavita.co.in/gambhir-kavita/t25968/new/#new