गुरुवार, ९ मार्च, २०१७

मोबाईल मधुन सुटती

मोबाईल मधुन सुटती

मोेबाईल मधुन सुटती
कविता, लेख अपार,
त्वरीत ट्याग करताती
फेसबुकचे वीर हे फार...

असता तुम्ही अॅक्टीव
लिहिता देखिल भरीव
दाविता आपला स्वभाव
उचलुनी फायदे ते फार...

करूनी विनंत्या थकता
वैेतागुनीही तुम्ही जाता
काहीच फरक न होता
ते ट्यागच करती फार...

© शिवाजी सांगळे 🎭
http://marathikavita.co.in/vidamban-kavita/t27683/new/#new

मंगळवार, ७ मार्च, २०१७

पण काहीही म्हणा... भ्रृणहत्या


पण काहीही म्हणा...
भ्रृणहत्या

पैशाचा हा मोह म्हणायचा?
कि विकृत मनाचा खेळ?
जन्मा आधीच जीवघेणा
जीवाशी का करतात खेळ ?

लपलेत असे खिद्रापुरे असंख्य
समाजात या उजळ माथ्याने,
शेण खाल्ले का? भ्रृणहत्येस
प्रवृत्त करणार्‍या मातापित्याने?

© शिवाजी सांगळे 🎭
http://marathikavita.co.in/marathi-vatratika/t27676/new/#new

सोमवार, ६ मार्च, २०१७

ताप

ताप

त्रास देतो सुर्य सकाळी
रात्रीस चंद्र ताप देतो,
जेव्हा जेव्हा अस्तित्वाचा
तूझा मज भास होतो !

=शिव
366/05-03-2017

जोड

जोड
काही वेळा पुरताच
असतो यांचा काडीमोड,
सत्तेसाठी करतात हे
कुणाशी ही सशर्त जोड !
=शिव
365/05-03-2017

अनिवार्य

अनिवार्य

बंगला आहे, कार आहे
एवढंच का फार आहे ?
शांती साठी मनाच्या
समाधान अनिवार्य आहे!

=शिव
364/04-03-2017

शुक्रवार, ३ मार्च, २०१७

सुख - दुःख

http://marathikavita.co.in/marathi-kavita-others/t27630/new/#new

http://marathikavita.co.in/marathi-kavita-others/t27632/new/#new


पण काहीही म्हणा... सेल्फी पाॅईंट?


पण काहीही म्हणा...
सेल्फी पाॅईंट?

तीनही राजकिय पक्ष
करताहेत सेल्फीश फाईट,
मुंबईच्या राजकारणात
गाजतोय सेल्फी पाॅईंट !

निवडणुक हरली म्हणुन
सोय काढण्यात काय पाॅईंट?
सद्यस्थिती पाहता नक्कीच
तापेल विषय सेल्फी पाॅईंट !

© शिवाजी सांगळे 🎭
http://marathikavita.co.in/marathi-vatratika/t27621/new/#new

बुधवार, १ मार्च, २०१७

विझती शेकोटी


विझती शेकोटी

शेकोटी विझु लागली
आणि सारी पत्रे?
ती सुध्दा जळून गेली,
जळून तर गेली, परंतु
जळून मुडपलेले कागद
तसेच होते, आणि
त्यावरील शाई दाखवित होती
उरलेल्या क्षीण शब्दांना...
लिहिलेल्या भावनांना...
उडेल राख मग हवे सोबत, न्
पुर्णत्व घेईल, एक प्रवास?
नात्यांचा...?
खरचं, असं होतं का?
कागद जळेल,
विखुरून जातील शब्द!
अंतरआत्म्यातून न् मनातून
पुसले जातील का ते?
क्षण, ती वेळ, त्या गोष्टी?
जळेल का एवढं सारं?
या विझत्या शेकोटीत?

© शिवाजी सांगळे 🎭
http://marathikavita.co.in/marathi-kavita-others/t27587/new/#new

पण काहीही म्हणा... हातावर तुरी?


पण काहीही म्हणा...
हातावर तुरी?

असाच का कुणी पळतो?
असावी नक्कीच हेराफेरी,
वापरून नेटवर्क स्वतःचे
चोर करतात सेटींग भारी !

नेहमी चोर पळून जातात
देवुन म्हणे हातावर तुरी,
चाखण्या चणा, मुग डाळ?
बदनाम होते उगीच तुरी !

© शिवाजी सांगळे 🎭
http://marathikavita.co.in/marathi-vatratika/t27586/new/#new