बुधवार, १ मार्च, २०१७

विझती शेकोटी


विझती शेकोटी

शेकोटी विझु लागली
आणि सारी पत्रे?
ती सुध्दा जळून गेली,
जळून तर गेली, परंतु
जळून मुडपलेले कागद
तसेच होते, आणि
त्यावरील शाई दाखवित होती
उरलेल्या क्षीण शब्दांना...
लिहिलेल्या भावनांना...
उडेल राख मग हवे सोबत, न्
पुर्णत्व घेईल, एक प्रवास?
नात्यांचा...?
खरचं, असं होतं का?
कागद जळेल,
विखुरून जातील शब्द!
अंतरआत्म्यातून न् मनातून
पुसले जातील का ते?
क्षण, ती वेळ, त्या गोष्टी?
जळेल का एवढं सारं?
या विझत्या शेकोटीत?

© शिवाजी सांगळे 🎭
http://marathikavita.co.in/marathi-kavita-others/t27587/new/#new

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा