शुक्रवार, २१ एप्रिल, २०१७

भीती

भीती
मनातुन वाटतं काहिंना
कुणी घ्याव आपल्याला कडेवर,
भीती पण वाटते त्यांना
काय होईल खाली पडल्यावर?
=शिव
21-04-2017

सीख

सीख

इश्क इबादत और
इबादत ही इश्क है,
तु मान, या ना मान
बंदे, यही तो सीख है !

=शिव
17/21-04-2017

गुरुवार, २० एप्रिल, २०१७

प्रवास

प्रवास

मातीतच जन्म आणि अंत
बाकि प्रवास जगण्याचा,
माती पर्यंत जाणारा...
तूमचा आमचा सर्वांचा...

=शिव
380/20-04-2017

चांदोमामा

चांदोमामा

चांदोमामा चांदोमामा थकलास का?
टाॅवरच्या मागे लपलास का?

टाॅवर आता झाला गगनचुंबी
नात्यात पण वाढली बघ लांबी

एकदवेळी अंगणात येउन जा
कधीतरी आमच्याशी खेळून जा
=शिव

मोद

मोद

कुणाला ना खंत  न कुणा खेद झाला
जाण्याने माझ्या  काहींना मोद झाला

थांबले कोण कधी कोणा खेरीज येथे
चाललो एकटा न् काय गहजब झाला

जगतोच मुळी नित्य मनसोक्त मोकळा
तरी ही वागण्याचा का अर्थ गूढ झाला

संघर्ष जगण्यास सारखा तुमचा माझा
जगलो स्वछंदि न कशाचा मोह झाला
   
कशाला ती पर्वा उगा करावी कुणाची?
जगण्या मनसोक्त शिव हा मुक्त झाला

© शिवाजी सांगळे 🎭
http://marathikavita.co.in/marathi-kavita-others/t28186/new/#new

बुधवार, १९ एप्रिल, २०१७

रंग श्रीरंग


रंग श्रीरंग
प्यायला अमृत
तो श्याम निल रंग
पुतनेच्या पाझर स्तनातुन
सुटले होते खोट्या वात्सल्याचे...

वर्णावे कसे
रंग ते श्रीरंगाचे
कालियाच्या फण्यावरचे
वाईटावर प्रकटले चांगल्याचे...

अर्पुनी ज्ञान जगता
केले मनी सज्ज पार्था
उचलण्या शस्त्र सत्या साठी
वदुनी सत्य ते विश्व कल्याणाचे...

© शिवाजी सांगळे 🎭
Bhakti Kavita, April 18, 2017, 11:39:24 PM
http://marathikavita.co.in/marathi-bhakti-kavita/t28245/new/#new

मंगळवार, १८ एप्रिल, २०१७

दश द्वार दिशा

दश द्वार दिशा

दश व्दारांनी वेध घेई
देह हा दश दिशांचा,
व्यतित करूनी आयुष्य
बोध न हो दिशांचा !

प्रथमतः दोन चक्षु ते
द्वीतीय श्रवणेंद्रिये दोन,
तृतिय दोन नासिका
चतुर्थ उरे एकची वदन !

महत्वाची दोन ती द्वारे
पंचम स्थानी मात्र उरती,
शरीरांतर्गत स्वच्छतेची
कामे स्वयें तीच उरकती !

अंतीम उरते दशम द्वार
मानवा ते ना त्वरी उमगते,
शोधता हा जन्म सरतसे
उर्ध्वदिशेस का न पाहवते?

© शिवाजी सांगळे 🎭
http://marathikavita.co.in/marathi-bhakti-kavita/t28222/new/#new

सोमवार, १७ एप्रिल, २०१७

जगायचे ना?


जगायचे ना?
सभोवताली येतात ऐकू
चिमण्यांची अजून गाणी,
संवर्धना साठी तयांच्या
ठेवा घास दाणे न् पाणी !

हेच देणे दैवाचे लाभले
मोफत तूम्हा आम्हाला,
टिकवा निसर्ग तेव्हांच
जगता येईल आपल्याला !

कत्तली करून झाडांच्या
का पाऊस पडणार येथे?
थांबवा, आहे वेळ अजून
जगायचे ना आपणासं येथे?

© शिवाजी सांगळे 🎭
http://marathikavita.co.in/preranadai-kavita/t28221/new/#new

खोज...

खोज...

आज के दौर मे
हर व्यक्ती
अपने हि बनाये
चक्रव्युह से
मुक्ति चाहता है।
घुम रहा है...
मुक्ति और शांती,
कि खोज में,
एक घाव लिए
अश्वथ्थामा जैसा!
© शिव 🎭
17042017

रविवार, १६ एप्रिल, २०१७

प्रवास

प्रवास

प्रवास अनंताचा चिरंतन
अव्याहत चालणारा,
माझ्यातल्या मी पर्यंतचा
गूढ मनाला शोधणारा !