मंगळवार, १८ एप्रिल, २०१७

दश द्वार दिशा

दश द्वार दिशा

दश व्दारांनी वेध घेई
देह हा दश दिशांचा,
व्यतित करूनी आयुष्य
बोध न हो दिशांचा !

प्रथमतः दोन चक्षु ते
द्वीतीय श्रवणेंद्रिये दोन,
तृतिय दोन नासिका
चतुर्थ उरे एकची वदन !

महत्वाची दोन ती द्वारे
पंचम स्थानी मात्र उरती,
शरीरांतर्गत स्वच्छतेची
कामे स्वयें तीच उरकती !

अंतीम उरते दशम द्वार
मानवा ते ना त्वरी उमगते,
शोधता हा जन्म सरतसे
उर्ध्वदिशेस का न पाहवते?

© शिवाजी सांगळे 🎭
http://marathikavita.co.in/marathi-bhakti-kavita/t28222/new/#new

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा