मंगळवार, ३० मे, २०१७

का अजुन

का अजुन

का अजुन गीत ते स्मरत नाही
मेळ शब्दांचा का जुळत नाही

ठेवु किती आठवात ती कहाणी
आठवावे कधी तीला कळत नाही

रेखाटले चित्र जे स्वप्नात देखलेले
माळण्या कुंकू हात हा वळत नाही

कुठवर जपावे महिरपी स्मृतींना
स्पर्शातले भाव त्यां सोसत नाही

जगण्याचे सांगु किती उरले जीने
अलगद ठेवणे पाय ते जमत नाही

© शिवाजी सांगळे 🎭
http://marathikavita.co.in/marathi-virah-kavita/t28684/new/#new

रविवार, २८ मे, २०१७

थोडे अजून काही

थोडे अजून काही

सारेच डाव तूझे, आता संपून गेले
अंतीम राहिलाे मी, बाकी निघून गेले

तालात काही गेले, सूरात लोप काही
साथीस वाव नाही, गाणे विरून गेले

थांबू तरी किती मी, मागे कुणीच नाही
झोपेत काहि होते, ते ही पळून गेले

गाफील राहिलो नी, मैत्रीेत चूर होतो
दोस्तच मानलेले, सारे लुटून गेले

थोडे अजून काही, होते जगायचे ते
पाठीत वार माझ्या, माझे करून गेले

© शिवाजी सांगळे 🎭
http://marathikavita.co.in/marathi-kavita-others/t28675/new/#new

कौलारू

सौ. श्रध्दाताई सावंत यांच कोकणातील सुंदर घर पाहून सुचलेली चारोळी...

शनिवार, २७ मे, २०१७

मुक

मुक

मुक्या वेदनेचा आवाज
दबल्या श्वासाची गाज,
उसवल्या मनाचा साज
वाहताे थेंब नेत्री आज !

=शिव
393/25-05-2017

बुधवार, २४ मे, २०१७

बेबसी


तराणे


तराणे

तुझे ते सजणे लज्जेने पहाणे
खरे मानले मी सर्व ते बहाणे

नटावे कशाला मला ते कळेना
खर्‍या सौंदर्याचे दर्पनी पहाणे

चंद्राने सजावे हट्ट तारकांचा
रूपा देखण्या ते निशेचे बहाणे

शब्दांनी पुनःश्च जुळूनीच यावे
तयांना फुटावे सुरांचे तराणे

फिरूनीच यावे लुप्त गीत ओठी
सजावे मुखी त्वा पुन्हा प्रेम गाणे

© शिवाजी सांगळे 🎭
http://marathikavita.co.in/marathi-prem-kavita/t28650/new/#new

मंगळवार, २३ मे, २०१७

कहाणी

कहाणी

का स्मरावी संध्येने
ती उदास विराण गाणी
जरी लिहिली कधी
कवीने विरहाची कहाणी
=शिव
392/23-05-2017