रविवार, २८ मे, २०१७

थोडे अजून काही

थोडे अजून काही

सारेच डाव तूझे, आता संपून गेले
अंतीम राहिलाे मी, बाकी निघून गेले

तालात काही गेले, सूरात लोप काही
साथीस वाव नाही, गाणे विरून गेले

थांबू तरी किती मी, मागे कुणीच नाही
झोपेत काहि होते, ते ही पळून गेले

गाफील राहिलो नी, मैत्रीेत चूर होतो
दोस्तच मानलेले, सारे लुटून गेले

थोडे अजून काही, होते जगायचे ते
पाठीत वार माझ्या, माझे करून गेले

© शिवाजी सांगळे 🎭
http://marathikavita.co.in/marathi-kavita-others/t28675/new/#new

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा