मंगळवार, १६ मे, २०१७

भास तूझा

भास तूझा

आभास पावलांचा, देतोय भास तूझा
स्मृतीत आठवांचा, हाेतोय भास तूझा

गंधाळला पहा हा, वारा तुझ्या सयीने
वेडावतो मला हा, स्वप्नाळु भास तूझा

सूरात गारव्याच्या, थेंबाळ पावसाळी
स्मृतीत आठवांच्या, स्वरात श्वास तूझा

रात्रीत गायलेला, साचा खमाज होता
प्रेमात सोबतीला, का सांग ध्यास तूझा

होताच चंद्रवर्खी, भावार्थ जीवनाचा
सारा विरून जातो, खोटाच राेश तूझा

साराच नूर ओला, ओढाळ पावसाचा
ओल्या सर्द दवाला, स्पर्श सुवास तूझा

© शिवाजी सांगळे 🎭
http://marathikavita.co.in/marathi-prem-kavita/t28589/new/#new

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा