शनिवार, ७ एप्रिल, २०१८

हायकू २९७-२९९

#हायकू २९९

छायाचित्र सौजन्य: श्री यल्लप्पा स. कोकणे

#हायकू २९८
शब्दांचा मेळ
मनभावन खेळ
हायकू वेळ ०६-०४-२०१८

#हायकू २९७

छायाचित्र सौजन्य: विशाखा नेवासकर-काळे 

बुधवार, ४ एप्रिल, २०१८

बेगडी भास

बेगडी भास

आयुष्या तू तकलादू फास आता
मूळ विसरलो बेगडी भास आता 

मायाजाल इथे खरा किती खोटा
भेटतील हवा फुंके रास आता

जगता लपवून चेहरा खरा इथे
मुखवटेच होतात रे खास आता

वांझोट्या नभाला पुळका धरेचा
घेतो करूनी उगाच त्रास आता

हवेत कशाला गोडवे खोट्याचे
बोलताच खरे म्हणती बास आता

पाठ त्याची थोपटून तोच घेतो

लाभतो कुणास हा विश्वास आता

© शिवाजी सांगळे 🎭
संपर्क:९५४५९७६५८९
http://marathikavita.co.in/marathi-kavita-others/t30675/new/#new

अवशेष माझा

अवशेष माझा

बदलतोय पहा कुस आता देश माझा 
प्रत्येक जण सांगतो चढव वेष माझा

हर एक इथे बोलतो दाखवित डोळे
धर्म, जात न् पंथ आहे विशेष माझा 

करूनी हुकूमत अंधारावर म्हणतो 
पुरून ठेव उरात हा अवशेष माझा 

विचारच खुंटतोय सारासार आता 
चढविता कोणी दाखवतो जोश माझा 

कशाला म्हणता मी दीन दुबळा झालो 
जाळपोळ, दंगलीत बघा त्वेष माझा

© शिवाजी सांगळे 🎭
संपर्क:९५४५९७६५८९
http://marathikavita.co.in/marathi-kavita-others/t30669/new/#new

सोमवार, २ एप्रिल, २०१८

बहाव



बंद करू या?

बंद करू या?

हा म्हणतो बंद करू या !
तो म्हणतो बंद करू या !

काही न करता ऊगाच
मी म्हणतो बंद करू या !

तो सुचवी भरल्या पोटी   
खान पान बंद करू या !

हातावर ज्या पोट असे
वदतो का बंद करू या?

कमवून जरा खुप होता 
दुकान हे बंद करू या !

लिहिले मी इतके सारे
लिहावे कि बंद करू या?

© शिवाजी सांगळे 🎭
संपर्क:९५४५९७६५८९
http://marathikavita.co.in/vidamban-kavita/t30649/new/#new

उजळणी



रविवार, १ एप्रिल, २०१८

शर

शर

चुकचुकते पाल एक छताला 
वाटे जीव तो पण तहाणला 

ध्यानात मश्गुल मिटून डोळे
विरक्ती सुर बकाने लावला 

लागली लयास उम्र चुलीची 
जवानीत नुकता गॅस आला 

मान्य कलावंत तुच शब्दाचा 
अनपढही पहा लिहू लागला 

झालाय हुशार तो जरा कुठे 
शर नथीतून मारू लागला 

© शिवाजी सांगळे 🎭
संपर्क:९५४५९७६५८९
http://marathikavita.co.in/marathi-kavita-others/t30648/new/#new

हायकू २९४ २९६

हायकू २९६
रूप ना रंग 
सर्वांना पडे भूल
एप्रिल फूल ०१-०४-२०१८

हायकू २९५
छायाचित्र सौजन्य: श्री प्रकाश नेवासकर

हायकू २९४
छायाचित्र सौजन्य: श्री प्रकाश नेवासकर

स्पर्श

स्पर्श

वाऱ्याचे असेच असते, हळूच येवून स्पर्शून जाणे,
नि:शब्द कळ्या फुलांना, स्मित देत खुलवून जाणे ! 

येणे जाणे जरी तयाचे, अस्तित्व तो ठेवून जातो,
स्मरण होता कधी कधी, रोमांचित करून जातो ! 

मौनाचा पहारा मौनात, बरेच काही बोलून जातो,
स्पर्श आणि मौन याच, भावनेने फुलून जातो ! 

खेळ असा लपाछपीचा, असाच रंगी रंगुन जातो,
सांज सकाळच्या उन्हात, अलगद मिसळून जातो ! 

सावरणे ते चांदणीला, स्वभाव गगनाचा तो,
हरवल्या तारकेला, क्षितिजा पल्याड शाधतो !

© शिवाजी सांगळे 🎭
संपर्क:९५४५९७६५८९
http://marathikavita.co.in/marathi-prem-kavita/t30646/msg71034/#msg71034