सोमवार, ७ जानेवारी, २०१९

रेस

रेस

खरं तर रेसच आहे... 
जगणं आणि मरणं, 
आपल्या हाती आहे
धावणं आणि धावणं !

इच्छा असो वा नसो
म्हणा प्राक्तनाचं देणं,
काय करू शकतो ?
उरतेय फक्त धावणं !

कशाला, कुणासाठी
निरर्थक प्रश्न विचारणं,
ठरवायचं नाही काही
पाळायचा नेम धावणं !

स्मरा किंवा स्मरु नका 
अनिश्चित आहे जगणं,
दुःखासह थोडेसे सुख
घेऊन ते सोबत धावणं !

© शिवाजी सांगळे 🎭
मो. ९५४५९७६५८९
http://marathikavita.co.in/gambhir-kavita/t31478/new/#new

शुक्रवार, ४ जानेवारी, २०१९

हायकू ३९३-३९५

#हायकू ३९५

पेन्टिंग सौजन्य: सौ. प्रतिभा घारे शिंदे

#हायकू ३९४

छायाचित्र सौजन्य: श्री मनोज बिंड

#हायकू ३९३

छायाचित्र सौजन्य: श्री प्रकाश नेवासकर

गुरुवार, ३ जानेवारी, २०१९

अधीर

अधीर

पाखरेही सांज वेळी 
अशी आतुरली सारी
शुभ्र नभां सांगाती
निघालीत ती माघारी

क्षितिजतळी भास्कर
साजरा पितांबर नेसला
गाण्यास निरोप गाणी 
एक तरुही सरसावला

सोहळा रम्य सृष्टीचा
असा हा रोजच रंगतो 
मिसळण्या चांद रात्रीत   
दिवस सारा अधीरतो

©शिवाजी सांगळे 🎭
मो.९५४५९७६५८९
http://marathikavita.co.in/marathi-kavita-others/t31472/new/#new

छायाचित्र सौजन्य: श्री प्रकाश नेवासकर