अधीर
पाखरेही सांज वेळी
अशी आतुरली सारी
शुभ्र नभां सांगाती
निघालीत ती माघारी
क्षितिजतळी भास्कर
साजरा पितांबर नेसला
गाण्यास निरोप गाणी
एक तरुही सरसावला
सोहळा रम्य सृष्टीचा
असा हा रोजच रंगतो
मिसळण्या चांद रात्रीत
दिवस सारा अधीरतो
©शिवाजी सांगळे 🎭
मो.९५४५९७६५८९
http://marathikavita.co.in/marathi-kavita-others/t31472/new/#new
छायाचित्र सौजन्य: श्री प्रकाश नेवासकर
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा