मंगळवार, १ जानेवारी, २०१९

नवं नवं...

नवं नवं...

नव्याचं काहुर नवं
जर पाहिलंच नीट तर 
काय असतं नवं?
तुम्ही, आणि मीच असतो,
कुटुंबही आपलं तेचं असतं...

घर, शेजार अन् परिसर 
मित्र मंडळी, स्नेही, 
मैत्री आणि दुष्मनी
जगवणारं नातं तेच असतं...

चहा पण नाही बदलत 
नव वर्षाच्या सकाळचा!
असूनही कुटुंबाची अपेक्षा...
खरंच विचारा मनाला
करतो आपण पुर्ण अपेक्षा?

विचारा न् स्वभावातल्या
वाईटात बदल व्हायला हवा
अहंकार, गर्व, अभिमान
बाजूला जायला नको का हवा?

असं काही झालं तर..!
ठरेल खरं नव्याचं नवेपण,
करुया का विचार असा
मिळून तुम्ही, मी...आपण?

© शिवाजी सांगळे 🎭
मो. ९५४५९७६५८९
http://marathikavita.co.in/preranadai-kavita/t31470/new/#new

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा