सोमवार, २३ डिसेंबर, २०१९

क्षण गोठले काही

क्षण गोठले काही

ओलसर सांज वारे भोवताली 
गंध रातराणीचा प्यायलेले,
एकाकी व्याकूळ दूर बासरीने
सूर विरही हळूवार छेडलेले !

रात्र अंधारली शोधात मौनाच्या 
तारकांनीही पदन्यास टाकले,
सुगंधित बंध स्मृतींचे आपुल्या
मनी आपसूक कसे हे दाटले !

गोठवून क्षण कोणते साठवावे 
तु मी आपण मिळून जगलेले,
कुजन ते फांदीवरल्या पाखरांचे 
अनाहत श्वासात सूर भिडलेले !

वळणावर त्या किती उसासे
ह्रदयी तुजला साठवून गेले,
एक एक श्वास बेभान होऊन
निशब्द अश्रू मी सोडून आले !

https://marathikavita.co.in/marathi-virah-kavita/t32181/new/#new

© शिवाजी सांगळे 🦋
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

वळणावर


६३८/२३१२२०१९

जाळे

जाळे

धुके आहे की धुळ हे सकाळी कळत नाही
उगवतो सुर्य की मावळतो चंद्र कळत नाही

आक्रसून मूळे भोवती झाडे उभी कशीबशी
प्राणवायू कसला त्यांस मिळतो कळत नाही

अवजड चमत्कारीक धडधड अखंड चौफेर 
हुसकावून देई पाखरांना कुठे ते कळत नाही

उडून गेली कळेना दूर कोठे पाखरे रानातली 
कोण घरी त्यां निवारा मिळाला कळत नाही

प्रदूषित हवा अशी झाडे इथली बेरंगी झाली
कोण निसर्गाशी मुद्दाम खेळतो कळत नाही

उन्नत प्रगती म्हणावी की विकास मार्ग जाळे
कोणत्या जाळ्यात फसतोय मी कळत नाही

https://marathikavita.co.in/gambhir-kavita/t32179/msg73085/#msg73085

© शिवाजी सांगळे 🦋
 संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

शुक्रवार, २० डिसेंबर, २०१९

यूँही


१२७/२०१२२०१९

आठव ठसे


६३७/२०१२२०१९

एकांत सूर


६३६/१९१२२०१९

सोचिए जरा


२०१२२०१९