शुक्रवार, २१ ऑगस्ट, २०२०

हिरवळ गाणं

हिरवळ गाणं 🌿

धक्का नभाला का हवा देऊन जाते

आठवणीने का त्याला रडू कोसळते


खोड्या काढण्यात पटाईत विज ती 

मुद्दाम सारखी अधून मधून चमकते


स्फुरते सर्वत्र नवचैतन्य या चराचरी 

मृदा तृप्त आपला अमृत गंध सांडते


मुसळधार होत मग कोसळते पाणी 

उगाच वाटेवर का ते सैरावैरा धावते


वृक्ष वेली, शहारती सारी लता झाडे

हिरवळ इथली आनंदाने गाणी गाते


मायाळू जन्मदात्री धरीत्री ती काळी 

एक एका बीजा उरी मायेने रुजवते


अत्याचार अनेक सोसून माणसांचे

सावरून स्वत:ला जगते न् जगवते 

https://marathikavita.co.in/marathi-kavita-others/t32767/new/#new

©शिवाजी सांगळे 🦋

 संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

सहारा






















२१०८२०२०

बुधवार, १९ ऑगस्ट, २०२०

तस्वीर


























१२५|१९०८२०२०

कायदा


भाव मनीचे कळणे न कळणे

वेळेचा तो एक कायदा ठरवतो

एकदा का समजून भाव येता

कोण तोटा कोण फायदा ठरवतो 

७०३|१८०८२०२० 

~शिव