शनिवार, ३१ जुलै, २०२१

तुज आठवांचे

 तुज आठवांचे

क्षणात स्फुरते क्षणात स्मरते

तुज आठवांचे मग गाणे होते


मनी घोळता उमाळे तुज स्मृतींचे

ओसंडूनी येती भाव मज मनीचे

विस्मरावे कसे कळेना गुज प्रेमाचे

वेळी अवेळी मन उगा बावरते

हलकेच हळूवार नेत्र पाणवते...१

तुज आठवांचे...


आयुष्याचे सगळे हिशोब फसले 

रस्तेच आपले जेव्हा विलग झाले

सारेच अवघड आता जगणे आले

सावरावे तोवर मन पुन्हा गुंतते

सांग तुलाही का हे कोडे पडते...२

तुज आठवांचे...


दिल्या घेतल्या त्या सऱ्या वचनांचे

रेखाटले चित्र मी भेटल्या स्थळांचे

मलाच उरे ना त्यात भान स्वतःचे

भावनांचे कुठवर हे खोडावे नाते

उचंबळून येता मन चिंबचिंब होते...३

तुज आठवांचे...

https://marathikavita.co.in/marathi-song-lyrics/t33499/new/#new

©शिवाजी सांगळे 🦋papillon

 संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

शुक्रवार, २३ जुलै, २०२१

काहूर गाणी

 काहूर गाणी

ओलेत्या पायवाटेवरती

ओल्या साऱ्या आठवणी

क्षण सर्व निसटूनी गेले

वळणावर धूसर कहाणी


हळूवार नात्यांची असते

अलवार रेशीम कहाणी

सैलावता तो तलम बंध

तेव्हा दाटते काहूर मनी


ह्रदयी दाटता गत स्मृती

स्वप्नेही गातात प्रेम गाणी

बंधनात पुन्हा नात्यांच्या

फुलू पाहते नवी कहाणी

https://marathikavita.co.in/marathi-virah-kavita/t33463/new/#new

©शिवाजी सांगळे 🦋papillon

 संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

बुधवार, २१ जुलै, २०२१

भुक दर्शनाची


















https://marathikavita.co.in/marathi-bhakti-kavita/t33450/new/#new

©शिवाजी सांगळे 🦋papillon

 संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

शुक्रवार, १६ जुलै, २०२१

आनंद रंग

















https://marathikavita.co.in/marathi-bhakti-kavita/t33423/new/#new

©शिवाजी सांगळे 🦋papillon

संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

शुक्रवार, ९ जुलै, २०२१

शोर ना कर




























https://marathikavita.co.in/hindi-kavita/t33374/new/#new

©शिवाजी सांगळे 🦋papillon

 संपर्क: +९१ ९५४५९७६५८९