बंद दरवाजा, हि वाट एकाकी मोकळी
आसक्ती म्हणू की ओढ तुझी गं वेगळी
फोडावयास कोंडी आतूरल्या भावनांची
सज्ज आहे निरागस, सांज एक सोवळी
भासतात का इथे स्पंदने मनाची मनाला
शांततेत इथल्या, तुझी न् माझी आगळी
शोधात तुझ्या, पायपीट इथवर जाहली
चाहूल ना कुठे तुझी मनी रिक्त पोकळी
सोहळे ऋतूंचे सर्व होतात त्यांच्या तऱ्हेने
का समजावी भेट आपली कुणी निराळी
https://marathikavita.co.in/index.php?topic=48974.new#new
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९








