वाहतोय सैरभैर मी वारा झालोय...
ओलांडून दऱ्याखोऱ्या मी भेटण्या आलोय
घेऊ म्हणतो विश्रांती क्षणभर येथे...
खबरबात प्रवासाची साऱ्या देण्या आलोय
किती ते गंध, रंग फुला माणसांचे...
ओळखू कसे खरे खोटे विचारण्या आलोय
कसे हे देणे प्राक्तनाचे मज भाळी...
चालेल कुठवर प्रवास हा जाणण्या आलोय
सगळेच कसे अनिर्बंध घडते येथे...
सैल का नियंत्रण?नियंत्या पाहण्या आलोय
https://marathikavita.co.in/index.php?topic=48488.new#new
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा