मंगळवार, २४ डिसेंबर, २०२४

स्मरण

स्मरण

कित्येक घडले येथे काळ्यावर पांढरे करून
रडले तरी शिकले खुप काही मारुन मुटकून

एक एक धडा इथला आयुष्यात कामी येतो
उगाच का प्रत्येक जण अवघे जीवन जगतो

वाटले नकोसे, काही धडे इथले कधीकाळी
पटते आता, बरेचसे येतात कामी वेळोवेळी

तरीही खंत एक उरात दडली का कुणा ठावे
विखुरले सवंगडी सोबतीचे त्यां कुठे शोधावे

धरून हात, ज्यांनी जीवनाचे ते धडे गिरवले
वळणावर आयुष्याच्या गुरुजन सारेच स्मरले
https://marathikavita.co.in/index.php?topic=49209.new#new
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा