बुधवार, २५ डिसेंबर, २०२४

अज्ञात वारकरी

अज्ञात वारकरी

शोधात कोण कोणाच्या इथवर मागोमाग चालले
वाट होती एकाकी, चालण्याचे तेव्हा भान कसले

भोळेभाबडे सारे, इथल्या अज्ञात पंढरीचे वारकरी
भास आभासात भेटले कित्येक, नाते असे कुठले

चाचपडता एक दूसऱ्यास कुणीच ना इथे कुणाचा
सोंग खरेखुरे तरीही बघ प्रत्येकाने हुबेहूब वठविले

ओढ अंतरीची जरी पदोपदी त्वा दावली कुणाला
आपल्यात दंगलाय जो तो, भान का त्यास उरले?

कुणा ठाऊक चालणार कुठवर ही वाटचाल अशी
देणे हे संचिताचे म्हणावे की फळ कर्माचे लाभले?
https://marathikavita.co.in/index.php?topic=49240.new#new
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा