बुधवार, ३१ ऑगस्ट, २०१६

दे धक्का...! पुन्हा स्वामी


दे धक्का...!
पुन्हा स्वामी

कोण योग्य कोण अयोग्य
वदले पुन्हा सुबह्मण्यम स्वामी,
यांना काढा त्यांनाच नेमा
दरवेळी आग्रह करतात स्वामी!

दिल्लीत म्हणे  गरज आहे
संघाच्या माणसाच्या नेमणुकीची,
जंग यांना पदावरून काढावे?
गरज नाही  वाटली कारणांची?

© शिवाजी सांगळे 🎭
http://marathikavita.co.in/marathi-vatratika/!-25221/new/#new

मंगळवार, ३० ऑगस्ट, २०१६

दे धक्का...! प्रसिध्दी धाव


दे धक्का...!
प्रसिध्दी धाव

कुणी काय खावं अन्
कुणी काय खावु नये,
हा फुकट सल्ला मात्र
कुणी कुणाला देवु नये !

आपलं काम आपण
प्रामाणिक पणे करावं,
प्रसिध्दी साठी उगाच
का तीच्या मागे धावावं?

© शिवाजी सांगळे 🎭
http://marathikavita.co.in/marathi-vatratika/!-25205/new/#new

रविवार, २८ ऑगस्ट, २०१६

दे धक्का...! रडीचा डाव

दे धक्का...!
रडीचा डाव

रोखठोक प्रश्नाला उत्तर नाही
जुनचं रडगाणं पुन्हा गात राही,
काश्मिरचं धुणं तुम्हा धुता येईना
आंतरराष्ट्रीय स्तरावर रडत जाई!

बाविस काय बाविसशे पाठवा
सहलीला तुमचे तुम्ही खासदार,
नेलात वाद जरी दोघांचा जगभर
खोटं ते कायम खोटंच राहणार !

© शिवाजी सांगळे 🎭
http://marathikavita.co.in/marathi-vatratika/!-25187/new/#new

शनिवार, २७ ऑगस्ट, २०१६

वेदना

वेदना

आसवे पुजलेली पाचविला नेत्रांच्या
आहुती वेदनेची जशी नश्वर देहाला !

© शिव 🎭

शुक्रवार, २६ ऑगस्ट, २०१६

समाज

समाज

केंव्हांच पुरले गेले
समाज पुरूष
तुमच्या आमच्यातले
जागवित होते जे
निंद्रीस्त समाजाला

आहेत काही मोजके
आजही जे...
उठवू शकत नाहीत
निंद्रेच सोंग घेतलेल्या
ढोंगी समाजाला

ज्यांना कसली चाड
सुकलेल्या रक्ताची
वा ओघळत्या
कोवळ्या आसवांची

© शिवाजी सांगळे 🎭
http://marathikavita.co.in/gambhir-kavita/t25167/new/#new

रूप तुझे


गुरुवार, २५ ऑगस्ट, २०१६

मला वाटते... पेरण्या पर्याय

मला वाटते... पेरण्या पर्याय

काल पेपरात एक बातमी वाचली, "कांद्याचे भाव गडगडले, कांदा फक्त पाच पैसे किलोने विकला गेला", खरचं फार दयनिय अवस्था झाली आहे शेतकर्‍याची. काय करावे त्याने? हमी भाव सुध्दा मिळत नाही.

एकिकडे पिक कमी झालं तर भाव वाढीमुळे हाच कांदा सामान्यांना रडवतो, व पिक अमाप झाले तर शेतकर्‍याला रडवतो. कांदा मात्र आपला रडविण्याचा गुणधर्म सोडत नाही.

या नेहमीच्या अडचणीवर तज्ञ मंडळींनी शोध घेउन उत्तर शोधावे व यातुन सर्वांची सुटका करावी. मी काही शेती तज्ञ वा जाणकार नाही तरी मला सुचलेला एक उपाय मांडत आहे, बाजाराचा अंदाज घेवुन गावात विचार विनिमय करून प्रत्येकाने वेगवेगळी पीके घेवुन सामुहीक पध्दतीने शेती केली जाउ शकते, अर्थात हा उपाय किती व्यवहार्य आहे हे तज्ञ मंडळी सांगु शकतील, तर काहींना हा पर्याय पटणार देखिल नाही, तरीही सुचवावासा वाटला, वाँट्सअँप वरील एका पोस्टने प्रेरीत होउन सुचलेला हा...

"पेरण्या पर्याय"...

करोन विचार
शेत ते पेरता
शक्य होते घेता
दुजे पिक

कुणी लावा कांदे
कुणी ते टमाटे
उरल्यां बटाटे
लोवोनिया

पर्याय असता
अन्य पिका साठी
दौड का ती मोठी
कांद्या साठी

वैविध्याचा मंत्र
ठेवोनिया ध्यानी
सर्व त्या बळींनी
पिकां साठी

विचार पुर्वक
घेता समजुन
हाटा उमजुन
घ्यावे पिक

हिणवण्या कोणा
नाही ईथे डाव
कल्याण ते व्हाव
कुणब्याचं

ईश्वरा प्रार्थना
करोनी वंदन
दे भरभरून
धान्य पाणी

होईल स्वयंभु
शेतकरी राजा
विश्वास तो माझा
म्हणे शिवा

© शिवाजी सांगळे 🎭
http://marathikavita.co.in/marathi-kavita-others/t25155/new/#new

दे धक्का...! उत्सवांचा त्रास


दे धक्का...!
उत्सवांचा त्रास

राजकिय चढाओढी साठी
आता सणांचा वापर होतो,
दहिहंडी आली कि उंचीचा
अकारण विचार केला जातो!

गणपतीत मंडप वाद, तर
नवरात्रीत गर्बा विषय होतो,
दिवाळीत आवाजाचा त्रास
दरवर्षी सर्वांना कसा होतो?

© शिवाजी सांगळे 🎭
http://marathikavita.co.in/marathi-vatratika/!-25148/new/#new

बुधवार, २४ ऑगस्ट, २०१६

दे धक्का...! नको त्यांना फाशी


दे धक्का...!
नको त्यांना फाशी

अज्ञानी चुकला तर हसु येते
ज्ञानी चुकला तर काय होते?
केंद्रीय शिक्षण मंत्र्यांच्या चुकीने
नविन वादाला तोंड फुटते !

केंद्रीय शिक्षण मंत्रीच जर
नको त्यांना देवु लागले फाशी?
असल्या शैक्षणिक वातावरणात
पिढी येणारी शिकेल कशी?

© शिवाजी सांगळे 🎭
http://marathikavita.co.in/marathi-vatratika/!-25140/new/#new