जीवनाचा अर्थ
कुणा कळला जीवनाचा खरा अर्थ
होऊ पाहतोय, इकडे जो तो समर्थ
म्हटले तर क्षणभंगुर आयुष्य सगळे
जगता चुकीचे जाणार ठरवून व्यर्थ
बहर, वाढ, पानगळ एक सृष्टी चक्र
बिघडता जरा कुठे ओढवतो अनर्थ
व्यापक जरी,वावर अल्पकाळ सर्व
अहंकार,मद शेवटाला ठरतो निरर्थ
पावलोपावलीचा तो स्वार्थ सोडता
जीणे अवघे, प्रत्येकाचे होइल सार्थ
https://marathikavita.co.in/index.php?topic=73012.new#new
©शिवाजी सांगळे 🦋 papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९








