अशक्य नाही
का म्हणायंच वेळ आता फार नाही
ठरवलंच तर अशक्य असं इथे काही नाही
कर मानवा तूच प्रयत्न मनापासून
तीला वाचवणारे तुझ्या शिवाय कुणी नाही
"पाणी आडवा अन् पाणी जिरवा"
जमीनीची धूप थांबवण्या बगैर पर्याय नाही
एक एक रोप प्रत्येकाने जपलं तर
पृथ्वी हिरवी झाल्या शिवाय राहणार नाही
इकडे अशक्य असलं काही नाही
विचार करण्यात हा काही अर्थ उरला नाही
©शिवाजी सांगळे 🦋 papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा