सोमवार, ६ जानेवारी, २०२५

बघ विचारून ०६०१२०२५ yq १०:४५:५२


बघ विचारून

विचारून बघ स्वतःला
काय तु देणार दुसऱ्याला

चांगलं वाईट खुप काही आहे
दे, असं जे उपयोगी पडेल कुणाला

सर्वच इथले भाडेकरू
सोबत फक्त सहवासाला

वाटूयात ठेवा सारा आनंदाचा
काय नेणार आहोत सांगा सोबतीला

©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९ 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा