बुधवार, १५ जानेवारी, २०२५

सुक्ष्म किती

सुक्ष्म किती

कधी कधी सावरावं लागतं...स्वतःला 
चुकतं कुठे विचारावं लागतं..स्वतःला 

कधीकाळी नसतानाही अपराध काही 
खापर दोषाचं सोसावं लागतं स्वतःला 

काय सुरू आहे जगरहाटी आजकाल 
दुरूनच रे लक्ष ठेवावं लागतं स्वतःला 

चालतोय खेळ सारा विलक्षण भोवती 
डावात येथील टिकावं लागतं स्वतःला

पसाऱ्यात विश्वाच्या या भल्या थोरल्या 
सुक्ष्म किती मी, पहावं लागतं स्वतःला

https://marathikavita.co.in/index.php?topic=50070.new#new
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा