केव्हातरी
स्वप्नातून वास्तविकतेकडे जायला हवं
प्रसंगी, स्वतःचं परिक्षण करायला हवं
गोड वाटतात ही स्वप्ने अचेतन मनाला
भान वास्तवतेचं चेतनेत ठेवायला हवं
असेल वळण सोपे, असे का समजावे
अंदाज घेत घेत वाटेवर चालायला हवं
कुठवर ठेवशील भरवसा आभाळावर
छत डोक्यावर तेवढं सांभाळायला हवं
चल, जाऊदेत साऱ्या बाता गैरवाजवी
केव्हातरी तु मनासारखं जगायला हवं
https://marathikavita.co.in/index.php?topic=50172.new#new
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा