आठव पक्षी
फिरुन अताशा हि आठवण कशाला
चुकला हिशोब साराच सांगू कुणाला
बराच काळ झाला गाठ नाही पडली
होईल भेट पुन्हा, आस होती मनाला
करून खोडी फांदीवर, एका पानाची
आठवणीत एक पक्षी हळूवार उडाला
स्तब्ध शांत असता परिसर भोवतीला
जळावरी हळव्या, तरंग का शहारला
होता शिडकावा पावसाचा तो जरासा
कळला ना अश्रू डोळ्यातला कुणाला
https://marathikavita.co.in/index.php?topic=50365.new#new
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा