बुधवार, २९ जून, २०१६

पाऊस


मन डोह


दे धक्का...! पुळका


दे धक्का...!
पुळका

मैत्रीचीच भाषा भारताने
आजपर्यंत खुपदा केली !
पाहून पाकिस्तानी कुरापत
तेंव्हा यांची वाचा बसली ?

पाक छायाचित्रकारांना
वार्तालापासाठी घेउन आले !
न् पुन्हा सुधीन्द्र कुलकर्णी
सेनेच्या रडार वर आले !!

दरवेळी हल्ला झाल्यावर
कुलकर्णी असंच करतात !
पुळका घेत पाकिस्तानचा
सेने कडून बोलणी खातात !!

© शिवाजी सांगळे 🎭
http://marathikavita.co.in/marathi-vatratika/!-24352/new/#new

मंगळवार, २८ जून, २०१६

दे धक्का...! रस्त्यावर वाद


दे धक्का...!
रस्त्यावर वाद

राजकारणाचा आजकाल
काँमेडी शो होउ लागला,
पाक्षिक जबाबदारी सोडून
हरएक वैयक्तीक बोलू लागला!

मैत्रीपुर्ण संबध म्हणता
यादवी सारखे भांडू लागले,
वाक् युध्दापर्यंत ठिक होतं
आता वादासह रस्त्यावर आले!

© शिवाजी सांगळे 🎭
http://marathikavita.co.in/marathi-vatratika/!-24344/new/#new

मन पावसाळलेले...


टिपटीप पाणी...

टिपटीप पाणी...

रात्रभर पावसाचीटिपटीप सुरू होती...
मी आठवणीं, मोकळ्या करीत होतो...

तीच छत्री काढुन मी उघड बंद केली
तु सुध्दा रेनकोटची घडी उगा विस्कटली

वॉलेट फाटकं मी पुन्हा पुन्हा कुरवाळलं
सुकल्या गजरयातील फुल, तु ही गोंजारलं

थेबां सोबत मी अश्रुंना मोकळी वाट दिली
अस्पष्ट हुंदक्यांनी त्यानां तु पण साथ केली

रात्रभर पावसाची टिपटीप सुरू होती...
मी आठवणीं, मोकळया करीत होतो...

रात्रभर ब-याच आठवणी गोळा झाल्या
रात्रभर सा-या पाण्यात सोडीत होतो...

रात्रभर घेउन थेंब थेंब अंगी भिजलो
रात्रभर गात्रनं गात्र चिंब करीत होतो...
रात्रभर शुष्क नात्यांना ओलावित होतो...

रात्रभर पावसाची टिपटीप सुरू होती...
मी आठवणीं, मोकळ्या करीत होतो...
© शिवाजी सांगळे 🎭

नित्य कर्म


सोमवार, २७ जून, २०१६

दे धक्का...! पाटर्यां व अत्याचार


दे धक्का...!
पाटर्यां व अत्याचार

पावित्र्य मानतो आम्ही
विविध सार्‍या धर्मांचे,
म्हणुन आयोजन करतो
आम्ही इफ्तार पार्टीचे !

सोहळे पाटर्यांचे इकडे
तीथे कायम गोळीबार,
अजुन किती करायचा
देशाने सहन अत्याचार?

© शिवाजी सांगळे 🎭
http://marathikavita.co.in/marathi-vatratika/!-24336/new/#new

रविवार, २६ जून, २०१६

दे धक्का...! स्मार्ट श्रेय वाद


दे धक्का...!
स्मार्ट श्रेय वाद

सगळ्यांना हल्ली वाटतंय
देशातील हर एक सिटी
एकदम स्मार्ट व्हायला हवी,

असता सिटी स्मार्ट आधी
आढेवेढे न घेता, कार्याची
पावती त्यांना द्यायला हवी!

मित्र पक्षासह, सर्वपक्षीय
बहिष्कार अन् काळे झेंडे
पाहण्याची वेळ का यावी?

© शिवाजी सांगळे 🎭
http://marathikavita.co.in/marathi-vatratika/!-24312/new/#new

तुझे गीत गाऊ दे...

तुझे गीत गाऊ दे...

दर वर्षी तु येतोस, सर्वांना सुखावतोस, पण मागील काही वर्षांपासून तू जरा रूसलास तरीही नको तेव्हा बरसलास. का रे तू असा वागलास? तुला माहीत आहे तुझ्यावाचून आम्हीच काय, सारी सृष्टी काहीच करू शकत नाही.

पृथ्वीवरील सारे जीव तूझ्या वाचून शुन्य आहेत, तूझ्या अमृतमयी थेंबानी सारी धरा शहारून येते, तीचं स्वतःचं रूप तुझ्या केवळ जाणिवेने बदलून जातं, पशु,पक्षी सारं काही नवसंजीवनी मिळाल्या सारखे ताजे तवाने होउन जातात. काल तुझं अस्तित्व जाणवलं, खिडकीत येउन तुला नमस्कार केला, मनातुन प्रार्थना केली कि "बाबा रे यंदा तु थोडासा लेट झालासं, काही हरकत नाही, तसा तु लहरी नाहीस, पण आमच्याकडचे हवामान खात्याचे जे लोक आहेत ना, त्यांचे अंदाज मात्र नेहमी चुकिचेच ठरतात, आता हे तुला आणि त्यांनाच ठावूक, कि कोण कुणाची फिरकी घेतयं ते? असो, तरी यंदा तुला अशी नम्र विनंती कि जरा मन मोकळा ये, आणि सर्व दूर ये, नाही तर काही ठिकाणी खुप दिवस तु मुक्काम करतोस, पार दैना होते रे सार्‍यांची, आणि ज्या ठिकाणी नाही येत त्यांची पण अवस्था चांगली नसते रे, समजुन उमजुन ये जरा, कारण तुला माहितच आहे कि तुझ्या शिवाय कुणाचेच पान हलणार नाही.

मला माहित आहे, मी तुला एवढं सागळं सांगतोय तरीही आमच्या पण काही चुका आम्हाला मान्य करायलाच हव्यात, आम्ही तुझा, तुझ्या निसर्गाचा सारा ढाचाच बदलून टाकला, नको इतकी जंगलतोड केली, शहरीकरणाच्या नावा खाली डोंगर फोडून तुझ्या हक्काचा थांबा हिरावून घेतला, तू जर थांबलाच नाहीस तर बरसणार कसा? याचं सुध्दा आम्हा मुर्खांना भान राहिलं नाही.
नुसत्या ईमारती बांधत राहीलो, त्या साठी अमाप झाडे तोडली, पर्यायाने जमिनीची धुप होउन तुझे जमा होणारे पाणी सुद्धा समुद्राकडे निघुन जाउ लागले, परिणाम स्वरूपी माळीन, ॠषीकेश वगैरे सारख्या घटना घडून गावेच्या गावे वाहून, गायब होउन गेली, म्हणजे तु व्यवस्थित बरसुन सुद्धा आमचे नियोजन नसल्या मुळे व कळत असुन वळत नसल्या मुळे, तुलाच दोषी ठरवायची खोड आम्हाला लागली. हे वरूण राजा आमची हि कृत्ये एकदा विसरून आम्हाला क्षमा कर.

यंदा येउन सारा जुना हिशोब चुकता कर आणि सार्‍या जगताला शांत कर, पुन्हा एकदा हि धरणी सुजलांम् सुफलांम् होउ दे, सगळ्यानी आनंदाने तुझे गीत गाउ दे.

© शिवाजी सांगळे 🎭
http://marathikavita.co.in/marathi-lekh/t24323/new/#new

शनिवार, २५ जून, २०१६

दे धक्का...! धमकी सत्र


दे धक्का...!
धमकी सत्र

जो उठतो, तो धमकी देतो
का म्हणुन कुणी ऐकुन घेतो?
मैत्री मधे पण तेच सुरू आहे
पक्ष कुणालाही पाठीशी घालतो?

असंच जरा काही होत राहिलं
तर "अच्छे" दिन नक्की येणार,
कुणाच्याही बेताल बोलण्याला
कसं अन् कधी आवरतं घेणार?

© शिवाजी सांगळे 🎭

http://marathikavita.co.in/marathi-vatratika/!-24307/new/#new

दे धक्का...! शिक्षणाचा भार


दे धक्का...!
शिक्षणाचा भार

शिक्षणा पेक्षा आजकाल
नोकर्‍यांचा दर्जा वाढला,
भार वाहक पदा साठी
एम् फील पायरी चढला !

असं वाटू लागलयं
आता नोकरी महाग झाली,
न् उच्च शिक्षण घेउन
पोरं बेकारच राहू लागली?

© शिवाजी सांगळे 🎭
http://marathikavita.co.in/marathi-vatratika/!-24304/new/#new

गुरुवार, २३ जून, २०१६

दे धक्का...! टाईम टेबल


दे धक्का...!
टाईम टेबल

थोड्याश्या पावसाने
दर वर्षी नेमकं असचं होतं,
न चुकता लोकलचं
टाईम टेबल नक्की बिघडतं !

नंतर चौकश्या वगैरे
सराईत पणे केल्या जातात,
प्रवाशांनी सोसलेल्या
त्रासाची भरपाई का देतात?

© शिवाजी सांगळे 🎭
http://marathikavita.co.in/marathi-vatratika/!-24284/new/#new

दे धक्का...! सर्वज्ञानी स्वामी


दे धक्का...!
सर्वज्ञानी स्वामी

निशाना साधायचा एकावर
करायचा हल्ला दुसर्‍यावर,
कुणीही सोडेल पद आपले
डाँ. स्वामींनी ठरविल्यावर !

रघुराम राजन झाले आधी, आता
अरविंद सुब्रमण्यम यांचीे वेळ आहे,
हात झटकून त्वरीत म्हणे भाजपा
हे स्वामींचे वैयक्तिक मत आहे !

७६ जणांची यादी गोळा करून
भाजपाने आता एकच करावे,
पंतप्रधानांना पायउतार व्हा म्हणत
डाँ.स्वामींनाच पंतप्रधान करावे !

© शिवाजी सांगळे 🎭
http://marathikavita.co.in/marathi-vatratika/!-24280/new/#new

दे धक्का...! काळी पिवळी


दे धक्का...!
काळी पिवळी

मुंबईचे टँक्सी चालक झाले सावध
न् टँक्सीं सोबत आले ना रस्त्यावर,
का वेळ आली विचार करण्याची
ओला व उबरने सेवा पुरवल्यावर?

चुका होतात जेंव्हा स्वतः कडून
नक्की दुसरा जातो फायदा घेउन,
आहे अद्याप वेळ तूमच्याच हाती
पहा प्रवाशांना चांगली सेवा देउन !

© शिवाजी सांगळे 🎭
http://marathikavita.co.in/marathi-vatratika/!-24263/new/#new

मंगळवार, २१ जून, २०१६

दे धक्का...! सत्ता संसार


दे धक्का...!
सत्ता संसार

स्वबळावर लढायचे म्हटले तरी
दोघांच्या मनी आहे थोडी भिती,
नको नको म्हणता तयार आहेत
अटी व शर्तीं वर करायला युती !

राजकारणात आता रूसवे फुगवे
ही तर नित्याची बाब झाली आहे,
एकमेकां सोबत नाही नांदले तर
सत्तेचा संसार का चालणार आहे?

© शिवाजी सांगळे 🎭
http://marathikavita.co.in/marathi-vatratika/!-24258/new/#new

रविवार, १९ जून, २०१६

अर्थ पाश

अर्थ पाश

जगण्या साठी "अर्थ" शोधता
वण वण फिरून प्रवास केला,
अर्थची तो ठरला निरर्थ अंती
सोडून सारे तो एकटाच गेला!

उरलेत केवळ पाश स्मृतींचे
कालौघात तेही विरून जातील,
सोहळे कसे, मरणाचे जगलेले
चविने का ते चघळले जातील?

© शिवाजी सांगळे 🎭
http://marathikavita.co.in/gambhir-kavita/t24243/new/#new

मी, ती आणि तो... पाऊस


ढग दाटलेले...


तृप्ती

तृप्ती

सरी अभंग असा बरसावा
कण कण धरेचा भिजावा
जगणारा जीव प्रत्येक इथं
तृप्त होउन सुखी व्हावा !

© शिव 🎭 

दे धक्का...! दोस्ताना

दे धक्का...!
दोस्ताना

तू मार, मी त्यांना चुचकारतो
असचं तर सद्या सुरू आहे
निवणुकांच्या तोंडावर तरी
असं बोलण्याची गरज आहे!

जुना दोस्ताना लक्षात घेता
फुले सुध्दा उधळावी लागणार,
अस्तित्व दाखविण्या साठी
यांनाही तीर सोडावे लागणार!

© शिवाजी सांगळे 🎭
http://marathikavita.co.in/marathi-vatratika/!-24230/new/#new

शुक्रवार, १७ जून, २०१६

दे धक्का...! पदाची पात्रता


दे धक्का...!
पदाची पात्रता

राष्ट्रपती होण्यासाठी
मी नाही योग्यतेचा, न्
बच्चनजीनी थांबवला
विषय राष्ट्रपतीपदाचा !

थट्टामस्करीत का कुणी
उगीच काही बोलतो?
दुधाने पोळलेला तेंव्हा
ताकही फुंकुनच पितो !

© शिवाजी सांगळे 🎭
http://marathikavita.co.in/marathi-vatratika/!-24212/new/#new

गुरुवार, १६ जून, २०१६

सरींनो


कुठे आहेस तू?


दे धक्का...! आत्मविश्वास


दे धक्का...!
आत्मविश्वास

कलमापण अहवालावर
शुभेच्छासह फोटो छापला,
त्याचा हास्यास्पद खुलासा
शिक्षणमंत्र्यानी लगेच केला!

फोटो पाहून प्रेरणेचे दिवस
कधीचे टळून गेले कि राव,
जाहिराती साठी आजकाल
बर्‍याच क्षेत्रात आहे ना वाव !

© शिवाजी सांगळे 🎭
http://marathikavita.co.in/marathi-vatratika/!-24196/new/#new

क्षण गोठलेला


क्षण गोठलेला

धुके हे दाटले
क्षण ही गोठले
तूझ्या मनी का
हे ची स्मरले?

तरू ही लाजला
दवांत नाहला
एकांत कसा हा
भेटी आसुसला

स्तब्ध ईमारती
अवती भोवती
प्रेमातुर आपणां
हळूच पाहती

भाव दाटलेला
भेटीत गोठलेला
स्मरू नित्य हा
क्षण अनुभवलेला

© शिवाजी सांगळे 🎭
http://marathikavita.co.in/marathi-prem-kavita/t24201/new/#new

बुधवार, १५ जून, २०१६

दे धक्का...! प्रेमळ विनंती


दे धक्का...!
प्रेमळ विनंती

आजकाल राजकारणी
कात टाकू लागलेत,
पांढर्‍या कपड्या सह
रंगीतही वापरू लागलेत!

कपड्या सोबत हल्ली
भाषा पण बदलू लागले,
प्रश्न विचारायच्या अगोदर
डिअर सुद्धा म्हणू लागले!

© शिवाजी सांगळे 🎭
http://marathikavita.co.in/marathi-vatratika/!-24182/new/#new

मंगळवार, १४ जून, २०१६

दे धक्का...! जात्यातुन सुपात


दे धक्का...!
जात्यातुन सुपात

कधी काळी जात्यात होते
तेच सारे आज सुपात आहेत,
आरोप व प्रत्यरोप करून
पुरती मजा करून घेत आहेत!

सत्ताधार्‍यांना रोज नवे
घोटाळे आता भोवणार आहे,
विरोधातील लोकांनी तशी
ताजी भविष्यवाणी केली आहे!

© शिवाजी सांगळे 🎭
http://marathikavita.co.in/marathi-vatratika/!-24167/new/#new

दे धक्का...! वाईटातून बरं


दे धक्का...!
वाईटातून बरं

दक्षिणेत रेंगाळला मान्सून
याचचं थोडं वाईट वाटतं आहे,
वाईटातून बरं म्हटलंच, तर
नाले सफाईला जादा वाव आहे!

सर्व स्थानिक प्रशासनांनी
वेळेचा सद्उपयोग करून घ्यावा,
शहरांमधे पाणी भरण्या पासून
जनतेला सुखद दिलासा द्यावा!

© शिवाजी सांगळे 🎭
http://marathikavita.co.in/marathi-vatratika/!-24166/new/#new

सोमवार, १३ जून, २०१६

दे धक्का...! साथीं चा धोका


दे धक्का...!
साथीं चा धोका

कुठेही पाणी साचलेले
डास अळ्यांना पोषक होते,
त्यातून पुढे पावसाळयात
सर्व आजारांना सुरवात होते!

पाणी जरी जीवन आहे
ते पण धोका देउ शकते,
स्वच्छ ठेवा परिसर सारा
गेस्ट्रो,डेंग्युची साथ येेउ शकते!

© शिवाजी सांगळे 🎭
http://marathikavita.co.in/marathi-vatratika/!-24162/new/#new

रविवार, १२ जून, २०१६

पाऊस...तूझा माझा


पाऊस...तूझा माझा

पागोळीत ओघळणारा
तळव्यावर नाचणारा
स्वप्नात जगविणारा
पाऊस...... तूझा

मुसळधार बरसणारा
थोडी फुरसत देणारा
चहाभजी आठवणारा
पाऊस.......... माझा

कसा कोण जाणे
हरवला हळुहळू तो
छत्रीत भिजविणारा
पाऊस... तूझा माझा

© शिवाजी सांगळे 🎭
http://marathikavita.co.in/marathi-kavita-others/t24156/new/#new

Dying wheels

Dying wheels of rural Maharashtra in modern Maharashtra... 




smart bull on divider....



बंध


दे धक्का...! पोस्टरबाजी


दे धक्का...!
पोस्टरबाजी

तुझं माझं जमेना, न्
तूझ्या वाचून करमेना,
लोकांच्या मनोरंजना साठी
का करताय ठणाणा ?

तू मारल्या सारखं कर
मी आणतो आव रडल्याचा,
तुमच्या ह्या पोस्टरबाजीत
होतो तमाशा राजकारणाचा!

© शिवाजी सांगळे 🎭
http://marathikavita.co.in/marathi-vatratika/!-24149/new/#new

शनिवार, ११ जून, २०१६

!! दिंडी !!


शोध


दे धक्का...! मौन मोकळं


दे धक्का...!
मौन मोकळं

ऐनवेळी काँग्रेसने दगा दिला
न् सत्ता हातातून घालवली,
या सरकारने पण दोन वर्षे
जाहीरातबाजीत घालवली !

"देशात सरकार बदललं
तरी परिस्थिती जैसे थे",
कबूल केलं काकांनी
पहले दिन भी वैसेही थे !

सतराव्या वर्धापन दिनी
आमचं सोळावं वरिस सरलं,
टिका टिप्पणी करतांना
काकांनीही काल मौन सोडलं !

© शिवाजी सांगळे 🎭
http://marathikavita.co.in/marathi-vatratika/!-24144/new/#new

शुक्रवार, १० जून, २०१६

एक प्रवास आगी सोबत...


एक प्रवास आगी सोबत...

          २६ जलै २००५ च्या महाभयंकर पुरातुन नुकतेच सर्वजण सावरले होते, त्या आठवणी ताज्या असतांनाच पुन्हा तशीच वेळ येते कि काय असा प्रसंग ओढवला...

          घटना, बरोबर १० वर्षा पुर्वीची, ६ सप्टेंबर २००५ ची संध्याकाळची वेळ, मुंबई सी.एस.टी वरून सुटणा-या ५.५५ च्या बदलापूर लोकल मधे आम्ही सर्व ग्रुप मेंबर्स स्थानापन्न झालो. नेहमी प्रमाणे  गाडी सुटल्याबरोबर आमची गाण्याची मैफल सुरू झाली, ज्या मैफलीला डब्यातील परीचित, अपरीचित प्रवाशांकडून उस्फुर्त दाद मिळत होती. आमच्यापैकी बहुतेक सर्वजण चांगले गायक असल्याने एका पेक्षा एक सुरेल गाण्यांची मैफल नेहमीच रंगत असे, गाणी गाता गाता प्रवासातला वेळ कसा जात असे हे अजिबात कळत नसे.
नोकरदारांना कोणत्याही परीस्थितीत घराबाहेर पडावेच लागते, त्या दिवशी सकाळ पासुन सारखा पाऊस पडत होता, आता सुध्दा बाहेर विजांच्या कडकडाटा सह पाऊस ब-यापैकि बरसत होता आणि आत डब्यात एकापेक्षा एक सुर बरसत होते, आमची गीत मैफल उत्तरोत्तर रंगत होती, एक तास दहा मिनिटांचा सी.एस.टी. ते अंबरनाथ हा प्रवास  कसा संपला हे कुणालाच समजले नाही, अंबरनाथ स्टेशनला गाडी नेहमी पेक्षा जरा जास्त वेळ उभी राहिल्याने सर्वाची चुळबुळ सुरू झाली होती, प्रत्येकजण काय झालं असेल याचे आडाखे बांधत होता, बाहेर पाऊस चांगलाच कोसळत असल्यामुळे प्रत्येकाने दरवाजे खिडक्या बंद करून घेतल्या होत्या त्यामुळे बाहेरची काहीच खबर कळत नव्हती, दरम्यान कशीबशी गाडी सुरू झाली होती.

        ज्या ठिकाणी आम्ही बसायचो तो अकरावा डबा बदलापूरच्या दिशेकडचा प्लँटफाँर्म सोडायचा बाकी होता, पुढील दहा मिनिटात बदलापूरला उतरायचे या विचारात आम्ही सारे असतांना एका झटक्या सोबत जोरदार धमाका झाला, आणि डब्यासह प्लँटफाँर्म वरील सर्व दिवे गेले, सगळीकडे गर्द अंधार झाला आणि आगीचा एक भला मोठा लाल पिवळा लोळ उठला, आगीची तिव्रता एवढी होती कि खिडक्या दरवाजे बंद असतांना सुध्दा बाहेरचा सारा परीसर त्यात उजळुन गलेला आम्हाला दिसला व पापणी लवेस्तोवर पुन्हा मिट्ट काळोख पसरला, क्षणभर माझ्या काळजाचा ठोका चुकला, "आपुले मरण पाहीले म्या डोळा" अवस्था झाली होती, पण पुढच्या काही मिनिटातच सावरलो,  कसलाही अंदाज येत नव्हता, बाँम्बस्फोट झालाय कि काय अशी काळीज हादरवणारी शंका मनाला वाटली. इथे डब्यात नुसता गोंधळ, आरडा ओरडा ऐकू येत होता, त्यातच पुन्हा एक आगीचा लोळ दिसला, आमच्या डब्यावर जणु कुणीतरी दिवाळीतला अनार फोडतोय कि काय असाच भास होत होता, भिती मिश्रित आश्चर्य अशी काहीशी अवस्था बाकी मित्रांची सुध्दा झाली होती, बाहेरून कुणीतरी सागितले कि गाडीच्या पेंटोग्राफला आग लागली आहे, त्याचेच स्फोट होत होते, इकडे मनातुन मात्र सगळ्यांचीच पार तरतरली होती.

          काही लोकांनी चालत्या गाडीतुन उडया टाकल्या, कुणी रडू लागले, काय न काय, परंतु आम्ही सारे समंजस पणे वागलो, मनातुन आठवतील त्या देवांचा धावा आम्ही करीत होतो. एकीच बळ काय असतं ते सर्वानी दाखवुन दिल, एकानेही उडी मारण्याची वा पळण्याची घाई केली नाही, महत्वाचं म्हणजे कुणीही पँनिक झाले नाही किंवा तसं कुणी दाखवल नाही, उलट एकदुस-याला धीर देवुन सावरत होते. बाहेर पावसाचा जोर वाढला होता, सोबत विजांचा कडकडाट आणि टपावर छोटे छोटे स्फोट सुध्दा.

          वातावरण गंभीर झालं होतं, परंतु प्रत्येकजण खुप धीराने वागला, सर्वप्रथम मोबाईल व छत्र्या बंद करायला सांगीतल्या, कारण बाहेर विजांचा चांगलाच नाच सुरू होता, दरम्यान पेंटोग्राफ मधुन उडणा-या ठिणग्या चुकवत चुकवत आम्ही सारे पुलाच्या सहाय्याने सावकाश प्लँटफाँर्मच्या उलटया बाजुला उतरलो, खरच त्या दिवशी नशिब बलवत्तर म्हणुन आम्ही सारे एका अनर्थातुन बचावलो.

          पेंटोग्राफ मधुन उडणा-या ठिणग्या पासुन दूर जाण्यासाठी आम्ही मानवी साखळी करून उलट चालु लागलो होतो, गाडी पासुन ब-यापैकी अंतरावर असतांना पुन्हा एक धमाका झाला, पुन्हा एक लोळ व ठिणग्या उसळल्या, त्याचा फटका काही लोकांना बसला, कित्तेकांना त्या ठीणग्यांमुळे चटके बसले, कुणाचे कपडे जळाले, गाडीतुन उडया मारल्या मुळे काहीना खरचटले, किरकोळ दुखापती झाल्या. त्या गडबडीत आमच्यातील एकाचे घडयाळ हरवले, याची हळहळ सा-यांनाच लागली होती.

          आम्ही सुखरूप एका टपरीजवळ पोहचलो, चहाची आँर्डर देतांना लक्षात आले कि आमच्यातील एकजण गायब आहे, पुन्हा ग्रुप मधे टेंन्शन वाढले, त्याला फोन लावायचा प्रयत्न केला तर त्याचा फोन बंद लागत होता, दरम्यान लक्षात आले कि विजा चमकत असल्या मुळे त्याने मोबईल बंद ठेवला असणार! कसाबसा चाहा घेतला व पुन्हा टपरीवर भेटायचे ठरवुन दोन दोनच्या गटाने आम्ही त्याला शोधायला निघालो, बराचवेळ शोधुन त्याचा पत्ता नाही लागला, त्या आधी एका दुकानदाराला विनंती करून त्याच्या फोनवरून एक दोघांच्या घरी सुखरूप असल्याचा निरोप दिला व तसा निरोप ग्रुपमधील सर्वांच्या घरी दयायची व्यवस्था केली. पुढे काय करायचे हे ठरवत असतांनाच समोर तो दिसला, प्रत्येकाच्या मनात भयंकर राग, उस्तुकता, आश्चर्य अशा सगळ्या भावना आल्या होत्या. शेवटी त्याने सांगीतले कि "मी घडयाळ शोधायला परत गेलो, बरीच शोधाशोध केल्यावर सापडले", हे घे... म्हणत त्याने घडयाळ समोर केले... तेव्हा मात्र सगळ्यांचा राग गायब झाला.

          येवढया सा-या गोंधळामुळे आधिच घरी जायला खुप उशिर झाला होता, सगळयांना भुका सुध्दा लागल्या होत्या, आमच्या सारखी स्थिती सा-याची झाली होती, प्रत्येकाला घरी जायचे होते, रिक्षा, बस जे वाहन मिळेल त्याने लोक जात होते, अखेरीस खुप मिनतवारी करून आम्ही एका रीक्षावाल्याला बदलापूर पर्यंत आणले व सारे जण आपआपल्या घरी सुखरूप पोहचलो.

         मैत्रीचे बंध कसे असतात हे या प्रसंगातुन दिसले, परस्परांची काळजी घेणं, वेळ प्रसंगी कुठलेही काम स्वतःहुन करणं हे कुणालाच सांगावे लागले नाही. चांगले मित्र भेटायला नशीब लागत, मला भेटलेत असे मित्र, आणखी काय हवं असत जीवनात? खरच आजही आम्हा सर्वांनी तो अतुट धागा जपुन ठेवला आहे.

= शिवाजी सांगळे, बदलापूर, जि.ठाणे +919422779941-+919545976589 email:sangle.su@gmail.com

रात्र रात्र


गुरुवार, ९ जून, २०१६

दे धक्का...! नाव न् वाव

दे धक्का...!
नाव न् वाव

शेक्सपियर म्हणाला
नावात सांगा काय आहे ?
नावातच सर्व काही
म्हणुन योजनेला भाव आहे!

स्टाँक जुना असला तरी
पँकिंग मात्र हे नविन आहे,
माल पोहचो ना पोहचो
कार्याला आमच्या वाव आहे!

© शिवाजी सांगळे 🎭
http://marathikavita.co.in/marathi-vatratika/!-24128/new/#new

बुधवार, ८ जून, २०१६

दे धक्का...! अदृष्य नशा


दे धक्का...!
अदृष्य नशा

दृष्यांवर केवळ कात्री चालवून
खरे वास्तव बदलणार नाही,
सत्य स्विकारल्या शिवाय तरी
परिस्थितीत बदल होणार नाही !

पंजाब मधील ड्रग्जची नशा
कशी बशी थांबवता येईल,
जातीवाद व धर्माच्या नशेला
देशभरात कसे आवरता येईल?

© शिवाजी सांगळे 🎭
http://marathikavita.co.in/marathi-vatratika/!-24110/new/#new

मंगळवार, ७ जून, २०१६

दे धक्का...! संवर्धन

दे धक्का...!
संवर्धन

रायगड किल्ला व परिसराच्या
विकासाची घोषणा झाली आहे,
पाचशे कोटीच्या आराखड्यास
जागेवरच मंजुरीही दिली आहे !

शिवराज्याभिषेक दिना पुरती
डागडूजी आता व्हायला नको,
रायगडावर जी केली घोषणा
प्रसिध्दी पुरती उरायला नको !

© शिवाजी सांगळे 🎭

http://marathikavita.co.in/marathi-vatratika/!-24090/new/#new 

सोमवार, ६ जून, २०१६

दे धक्का...! दोष कुणाचा?


दे धक्का...!
दोष कुणाचा?

दोष सोयीच्या रस्त्याचा
कि सदोष वाहनांचा ?
म्हणावा खेळ दैवाचा
कि अज्ञानी चालकांचा?

यंत्रणेला तर आम्ही
नेहमीच टार्गेट करतो,
वाहने चालवितांना मात्र
स्वतःच्या चुका विसरतो !

© शिवाजी सांगळे 🎭

http://marathikavita.co.in/marathi-vatratika/!-24074/new/#new

रविवार, ५ जून, २०१६

दे धक्का...! झाडे लावू


दे धक्का...!
झाडे लावू

बोलाची कढी अन्
बोलाचाच भात होतो,
शिळ्या कढीला फिरून
पुन्हा पुन्हा ऊत येतो !

दरवर्षी झाडे लावू
म्हणत आदेश निघतो,
झाडे लावण्या पुर्वीच
पावसाळा निघुन जातो !

© शिवाजी सांगळे 🎭

http://marathikavita.co.in/marathi-vatratika/!-24067/new/#new

हे सृष्टी...

आज जगतिक पर्यावरण दिन, 
एक मागणे सृष्टी कडे...

हरीत वसुंधरा

जागतिक पर्यावरण दिना निमित्त एक जुनी कविता...

हरीत वसुंधरा

वादळा रे तू असा कसा ?
नेलास मोडुनी डाव सारा !
निवारा पक्षांचा, तू पाडला
वाटसरूंचा सावली सहारा !!

छेडले आधी आम्हीच निसर्गा
देवुनी पोकळ प्रगतीचा नारा !
केले कत्तल झाडांना रस्त्यां
वाढवुनी रूदीकरणाचा पसारा !!

पेरायची बीजे नवी कोणती
ठरविण्या जातो वेळ सारा !
बिघडुनी सारा तोल सृष्टीचा
उरतो मानव दीन बिचारा !!

एक रोप रूजवुनी घ्यावे
पुण्य थोडे जगता संसारा !
अनंत रूपे आशिर्वाद देता
बहरेल ही हरीत वसुंधरा !!

© शिवाजी सांगळे 🎭

दे धक्का...! एका माळेचे मणी


दे धक्का...!
एका माळेचे मणी

जाणे येणे नाही आपल्या हातीे
तोच तर सृष्टीचा नियम असतो,
राजकारणात थोडं वेगळ असतं
अनेकांसाठी एक काढला जातो!

कालचा मित्र आज होतो शत्रु, न्
कालचा दुश्मन आज मित्र होतो,
इथे सगळेच मणी एका माळेचे
सत्ते साठी कुणी कुणाचा नसतो!

© शिवाजी सांगळे 🎭
http://marathikavita.co.in/marathi-vatratika/!-24058/new/#new

शनिवार, ४ जून, २०१६

दे धक्का...! कोरडा आव


दे धक्का...!
कोरडा आव

फुलाची हर एक पाकळी
स्वः अस्तित्वाने जगत असते,
दोष द्यायचा ठरवलचं तर
कळी, पाकळी खुडावी लागते !

फुला फुलात कमी अधिक
अाप पर भाव नक्की असतो,
कायम पाण्यात राहून सुध्दा
कोरडे राहण्याचा आव असतो !

© शिवाजी सांगळे 🎭

http://marathikavita.co.in/marathi-vatratika/!-24051/new/#new

वारी