शुक्रवार, १ डिसेंबर, २०१७

दे...दे

दे...दे

माळ म्हणतो जरा वारा दे
समुद्र म्हणतो जरा किनारा दे

पाणी म्हणते जरा निचरा दे
सावली म्हणते जरा आसरा दे

छत म्हणते जरा निवारा दे
तिजोरी म्हणते जरा पहारा दे

विज म्हणते जरा खतरा दे
पक्षीणी म्हणते जरा चारा दे

श्रीमंती म्हणते जरा डोलारा दे
माणुसकी म्हणते जरा सहारा दे

© शिवाजी सांगळे 🎭
http://marathikavita.co.in/marathi-kavita-others/t29952/new/#new

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा