गुरुवार, २१ डिसेंबर, २०१७

किंमत?

किंमत?

देहच होता गाव वेदनेचा 
वावटळ उठे चिकित्सेची,
विशेष उपचारां दरम्यान 
मर्यादा नसते सल्ल्यांची !

मोल चुकविता दु:खांचे
पडे कमतरता रोकडीची,
सोपस्कार करतांना पुर्ण
दमणूकच होते कुटुंबाची !

थेंब थेंब अश्रु चुकवितो 
किंमत नीत्य जगण्याची, 
रोज रोज आता प्रतिक्षा
उरे तीळ तीळ मरण्याची !

 © शिवाजी सांगळे 🎭
http://marathikavita.co.in/gambhir-kavita/t30081/new/#new

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा