शुक्रवार, १५ फेब्रुवारी, २०१९

गावात

गावात

राहणे माझे जरी शहरात आहे
गुंतला अजून जीव गावात आहे

सूर पारंब्या आणि आठवते नशा
पोहायची नदीच्या पाण्यात आहे

खेळलो खेळ मी सारे मातीत ज्या
दरवळ तीचा आजही मनात आहे

आवाज गुंजतोय कानी अजूनही 
पारवा तो मोकळ्या रानात आहे

तुरा आठवतोय ऊसाचा कोवळा
उभा डौलात काळ्या शेतात आहे

जरी उडवतो गाड्या शहरात येथे
असली मजा त्या बैलगाडीत आहे

© शिवाजी सांगळे 🎭
मो. ९५४५९७६५८९
http://marathikavita.co.in/marathi-kavita-others/t31532/new/#new

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा