रविवार, ११ ऑगस्ट, २०१९

थांब रे पावसा

थांब रे पावसा

थांब थांब रे पावसा
दिला तर होता पैसा

पैसाच ठरला खोटा
न् तू बरसलास मोठा

आल्या मोठ्या सरी
पाणीच पाणी शहरी

वाहिली धरणे भरून
गावे गेली ना रे वाहून

गुरं, ढोरं आणि शेती
झाली सगळ्यांची माती

आता जरा थांबशील
लोकांना उसंत देशील

एक मात्र नेमकं झालं
सर्वांच्या ध्यानी आलं

पूर जरी तू आणलास
जगाला धडा दिलास

जात धर्म आणि पंथ
होवो सगळ्याचा अंत

© शिवाजी सांगळे 🎭
 संपर्क:९५४५९७६५८९
http://marathikavita.co.in/marathi-balgeet-and-badbad-geete/t31957/new/#new

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा