मंगळवार, ३१ डिसेंबर, २०१९

खुदसे


१३५/३११२२०१९

शेवटचं पान

वर्षे येतात जातात,
धांडोळा घेता काही
उणे-अधिक जाणवतात...
आपण सहज रूळतो,
कुस बदलतो,
जसं डायरीचं पान पलटतो,
समोरचं कोरं पान
नव्या संकल्पांची प्रतिक्षा करीत असते...
तरी मन?
शेवटच्या पानावर रेंगाळत असते...
"शेवटचं पान" बरंच काही घेऊन मुक असतं...
३११२२०१९

शुक्रवार, २७ डिसेंबर, २०१९

पतझड़



न रोके कोई होती इस पतझड़ को
यहां पर मौजूद हरकोई है जाने को

तय करता है सफ़र झोंका हवा का  
मजबूर हर एक यहां पर चलने को

रहती है रास्तों पर कुछ निशानियां 
समय बाद देर सवेर मिट जाने को

कोशिशें भी सारी रंग लाती है तभी
हौसला रखती है दौड़ में टिकने को

https://marathikavita.co.in/hindi-kavita/t32194/new/#new

मंगळवार, २४ डिसेंबर, २०१९

सोबत


६४०/२४१२२०१९

होरपळ


६३९/२३१२२०१९

ज़िदगी


१२९/२४१२२०१९

भेट


३१०/२२१२२०१९

हात


३०९/१९१२२०१९

पट


२८/१९१२२०१९

सोमवार, २३ डिसेंबर, २०१९

क्षण गोठले काही

क्षण गोठले काही

ओलसर सांज वारे भोवताली 
गंध रातराणीचा प्यायलेले,
एकाकी व्याकूळ दूर बासरीने
सूर विरही हळूवार छेडलेले !

रात्र अंधारली शोधात मौनाच्या 
तारकांनीही पदन्यास टाकले,
सुगंधित बंध स्मृतींचे आपुल्या
मनी आपसूक कसे हे दाटले !

गोठवून क्षण कोणते साठवावे 
तु मी आपण मिळून जगलेले,
कुजन ते फांदीवरल्या पाखरांचे 
अनाहत श्वासात सूर भिडलेले !

वळणावर त्या किती उसासे
ह्रदयी तुजला साठवून गेले,
एक एक श्वास बेभान होऊन
निशब्द अश्रू मी सोडून आले !

https://marathikavita.co.in/marathi-virah-kavita/t32181/new/#new

© शिवाजी सांगळे 🦋
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

वळणावर


६३८/२३१२२०१९

जाळे

जाळे

धुके आहे की धुळ हे सकाळी कळत नाही
उगवतो सुर्य की मावळतो चंद्र कळत नाही

आक्रसून मूळे भोवती झाडे उभी कशीबशी
प्राणवायू कसला त्यांस मिळतो कळत नाही

अवजड चमत्कारीक धडधड अखंड चौफेर 
हुसकावून देई पाखरांना कुठे ते कळत नाही

उडून गेली कळेना दूर कोठे पाखरे रानातली 
कोण घरी त्यां निवारा मिळाला कळत नाही

प्रदूषित हवा अशी झाडे इथली बेरंगी झाली
कोण निसर्गाशी मुद्दाम खेळतो कळत नाही

उन्नत प्रगती म्हणावी की विकास मार्ग जाळे
कोणत्या जाळ्यात फसतोय मी कळत नाही

https://marathikavita.co.in/gambhir-kavita/t32179/msg73085/#msg73085

© शिवाजी सांगळे 🦋
 संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

शुक्रवार, २० डिसेंबर, २०१९

यूँही


१२७/२०१२२०१९

आठव ठसे


६३७/२०१२२०१९

एकांत सूर


६३६/१९१२२०१९

सोचिए जरा


२०१२२०१९

गुरुवार, १२ डिसेंबर, २०१९

डर


१२०/१२१२२०१९

मदद

 जो दूर लेकर जाते है
क्यूँ सोचना उन रास्तों को
ढूंढों राह एक आसान
मदद करें दिल जोडने को...
११९/१११२२०१९