सोमवार, ४ जुलै, २०२२

अंकुर

अंकुर

दिस सहज ढळतो रात होते कातर कातर
आठवणीत तुझ्या मनी उठते काहूर काहूर

वळचणीं जशी होती पाखरे आतुर आतूर
पावसात चिंब लागते भेटीची अशी हुर हूर

डोलतो डौलात वाऱ्यावर एक सरींचा पदर
सांगावे कसे कुणी त्यास जरा सावर सावर

डोकावती सारी जळामधे झाडे लहान थोर
सांगे वारा पानांना काळजीने आवर आवर

सरी खेळ पाण्याचा हा नाचतो पाण्यावर
नदी नाल्यांना फुटतो ओला पाझर पाझर

सुखावूनी जाता जाता धरणी राहते गर्भार 
हलकेच फुटतो भुईला पुन्हा अंकुर अंकुर

https://marathikavita.co.in/marathi-kavita-others/t37415/new/#new

©शिवाजी सांगळे 🦋papillon
 संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा