गुरुवार, ३० नोव्हेंबर, २०२३

उदास रात


























उदास रात

रात एक उदास कविता है, गर जानते हो
समेटती है दर्द दिनभर के गर समझते हो

कई खुशियाँ लुटाती है वो एक दूसरों पर
किया होगा एहसास कभी, गर मानते हो

है उसे भी उम्र, हयात, तुम्हारे हमारे जैसी
सुनाई देता कहराना गौर से, गर सुनते हो

भरती होगी सिसकियाँ वोभी बंद जुबाँ से
पडेगी कनोंपर आंहें उसकी,गर चाहते हो

महसूस होगी तुम्हें बदलती धडकनें सारी
साधकर चुप्पी साथ उसके,गर जागते हो

https://marathikavita.co.in/hindi-kavita/t45150/new/#new

शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

आभासी जग ३०११२०२३ YQ १०:५०:०५















आभासी जग

आभासी जगाची किमया न्यारी
असो नसो इच्छा मनी
तरीही घडविते त्याचीच वारी

भेटतात कधी सह्रदयी येथले
गंडा घालण्या काही टपले!
करावे साध्य जे मनात जपले

सारा खेळ मोकळा इथला
व्यक्त होण्या मुफ्त मंच लाभला
तरीही जोतो जगतो आपला

येणे जाणे येथे क्षणिक असते
टाळू म्हणता जमत नाही
या शिवाय का दुसरे सुचते?

©शिवाजी सांगळे 🦋papillon
 संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

रविवार, २६ नोव्हेंबर, २०२३

म्हटलं तर २६११२०२३ YQ ०८:३२:२५



























म्हटलं तर

कुठे चुकलो मी आयुष्यात...
गेला वेळ सारा शोधण्यात...

गवसतय का काही म्हणता...
उगाच तुझं माझं करण्यात...

गरजे पुरतं असावं सोबती...
उगा त्याग नको आयुष्यात...

ऐकतो, वाचतो, पाहतो ही...
तरी व्यस्त आम्ही संचयात...

म्हटलं तर, सोपं आहे सारं...
पटेल आणलं तर अमलात..

प्रेरणादायी कविता, 26-11-2023 YQ 08:32:25 AM

शनिवार, १८ नोव्हेंबर, २०२३

चाहूल थंडीची















चाहूल थंडीच

लागता चाहूल थंडीची मन धुक्यात न्हाऊन जाते

रस्ते न् गल्लोगल्ली उब शेकोटीची जाणवू लागते


दिसती फिरून, घरोघरी उबदार वस्त्रे ठेवणीतली 

चौकात स्वेटर मफलर शालींची रंगीत गर्दी दिसते


हलकेच ऋतू मनामनावर मग अद्भुत जादू करतो

गुंतले असो मन कैफात कोण्या तेही गुलाबी होते


अल्पावधी ठरते आयुष्य नेमके मलमली धुक्याचे

सहस्रश्मींनी हळूहळू जसे, नभांगण व्यापू लागते


फिरून एक नवे चक्र फिरते, सृष्टीचा नुर बदलतो

पानगळ सरू होता हलके, शिशिराची चाहूल होते

https://marathikavita.co.in/marathi-kavita-others/t45069/new/#new

©शिवाजी सांगळे 🦋papillon

 संपर्क: +९१ ९५४५९७६५८९



ही दुनिया


























ही दुनिया

ही सारी दुनिया कुणाला रे कळली गड्या?
जो तो शहाणा येथे, समजून तु रे घे वेड्या

वागतो मर्जीने स्वतःच्या कुणी दुसऱ्याच्या
कमवून स्वैर मार्गी बांधती माडीवर माड्या

कोण मोजतोय वाढली लोकसंख्या एवढी
ताळमेळ बिघडवून शहरात दौडती गाड्या

बंधने पाळावी कुणी कशी, सारेच सांगती
समजेना कुणास जोवर पडत नाही छड्या

म्हणून सांगतो नाही कळली दुनिया कुणा
जो तो शहाणा येथे, समजून तु रे घे वेड्या

https://marathikavita.co.in/gambhir-kavita/t45051/new/#new

©शिवाजी सांगळे 🦋papillon
 संपर्क: +९१ ९५४५९७६५८९