सोमवार, २५ मार्च, २०२४

या रंगात २५०३२०२४ yq १७:५५:०५

























या रंगात

जगावे रे सदा नित्य या रंगात जगाच्या
अन्यथा पडशील एकटा मागे जगाच्या

भोळीभाबडी नाही, जरा ही जगरहाटी
टाळता, राहशील पाठीमागे तु जगाच्या

चालते जग, कित्येक धर्म पंथात,रंगात
तरी असतो, एकच रंग रक्तात जगाच्या

विखुरला,वाटला गेला माणूस कितीही
उरते तरी, माणुसकी पाठीवर जगाच्या

ठरते श्रेष्ठ कायम कर्म आपले मानवाचे
होते अमर सत्कर्म इतिहासात जगाच्या

©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

शनिवार, २३ मार्च, २०२४

भिमरायाचं ज्ञान

























भिमरायाचं ज्ञान

सोनं आहे शंभर नंबरी, माझ्या भिमरायाचं ज्ञान 
उद्धारुन सर्वांना जपलं सामाजिक समतेचं भान ||धृ||

संविधानाला दिशा दिली दलितांना आशा दिली
अन्यायाला विरोध करीत जगण्याची स्वप्ने दिली
शिक्षणाचे सांगून महत्त्व रुजविले रोप एक छान
शिकून व्हा रे, तुम्ही संघटीत दिली क्रांतीची तान
सोनं आहे शंभर नंबरी... || १ ||

मुक्त करून चवदार तळे लिहिली अनोखी गाथा
खुले करून पाणी जगास दावली समतेची कथा
पटवून परीभाषा विकासाची, दिले देशाला ज्ञान
बांधून सोन, कोसी, महानदी वरती धरणे महान
सोनं आहे शंभर नंबरी... || २ ||

स्त्रीमुक्ती,शिक्षण स्त्रीच्या कल्याणाचे बीज रोवले
परंपरा तोडाया, हिंदू कोड बिलाचे प्रयोजन केले 
अमर झाले प्रबुद्ध भारत, मूकनायकचे पान पान
दीन दलित गरीब वंचिताना त्वा दिला स्वाभिमान
सोनं आहे शंभर नंबरी... || ३ ||

https://marathikavita.co.in/index.php?topic=45253.new#new

©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

बुधवार, १३ मार्च, २०२४

आयुष्याशी प्रेम



























आयुष्याशी प्रेम

आयुष्याशी प्रेम माझे ठरवून असे झाले नाही 
मागितले जे त्याने काही त्यास ना म्हटले नाही 

गट्टी दोघांची कधी, कशी जमली कुणा ठाऊक 
साथ एकमेकाची, सोडण्या कुणी धजले नाही

खोड्या त्याच्या, दोष माझे, जरी कित्येक तरी
अजूनही, स्पष्टीकरण कुणी कुणास दिले नाही

चढ उतार, रुसवेफुगवे, नात्यात या आले गेले 
ठावूक नाही, हिशोब त्यांचे, कधी मांडले नाही

आहे, खरी गम्मत थोडीशी आणखी छान पुढे
नाचवून,नाचून दोघं, अजून कुणी थकले नाही

https://marathikavita.co.in/index.php?topic=45252.0

©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

बुधवार, ६ मार्च, २०२४

संभ्रम ०६०३२०२४ YQ ११:३५:०२

























संभ्रम

पुन्हा संभ्रम तोच...तोच का पडावा? 
आपलाच चेहरा का परका भासावा? 
तीच मी आणि आरसाही तो रोजचा 
माझं ठिक रे भेद त्याला का दिसावा?

नसले जरी ठरवून बदलत रोज रोज 
रंगानी मेकअपवर फरक का करावा?
वेळेनुसार रापतो आरसा अन् चेहरा 
खरं संबध यात कुणाचा का मानावा?

रोजचेच व्यापलेले तेचतेच ते जगणे 
भोवतीचा, नित्य रिवाज का असावा?
बदलावे जरा स्वतः म्हणता कधीतरी
क्षणोक्षणी बेत ठरलेला का फसावा?

©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९