शनिवार, २३ मार्च, २०२४

भिमरायाचं ज्ञान

























भिमरायाचं ज्ञान

सोनं आहे शंभर नंबरी, माझ्या भिमरायाचं ज्ञान 
उद्धारुन सर्वांना जपलं सामाजिक समतेचं भान ||धृ||

संविधानाला दिशा दिली दलितांना आशा दिली
अन्यायाला विरोध करीत जगण्याची स्वप्ने दिली
शिक्षणाचे सांगून महत्त्व रुजविले रोप एक छान
शिकून व्हा रे, तुम्ही संघटीत दिली क्रांतीची तान
सोनं आहे शंभर नंबरी... || १ ||

मुक्त करून चवदार तळे लिहिली अनोखी गाथा
खुले करून पाणी जगास दावली समतेची कथा
पटवून परीभाषा विकासाची, दिले देशाला ज्ञान
बांधून सोन, कोसी, महानदी वरती धरणे महान
सोनं आहे शंभर नंबरी... || २ ||

स्त्रीमुक्ती,शिक्षण स्त्रीच्या कल्याणाचे बीज रोवले
परंपरा तोडाया, हिंदू कोड बिलाचे प्रयोजन केले 
अमर झाले प्रबुद्ध भारत, मूकनायकचे पान पान
दीन दलित गरीब वंचिताना त्वा दिला स्वाभिमान
सोनं आहे शंभर नंबरी... || ३ ||

https://marathikavita.co.in/index.php?topic=45253.new#new

©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा