बुधवार, १३ मार्च, २०२४

आयुष्याशी प्रेम



























आयुष्याशी प्रेम

आयुष्याशी प्रेम माझे ठरवून असे झाले नाही 
मागितले जे त्याने काही त्यास ना म्हटले नाही 

गट्टी दोघांची कधी, कशी जमली कुणा ठाऊक 
साथ एकमेकाची, सोडण्या कुणी धजले नाही

खोड्या त्याच्या, दोष माझे, जरी कित्येक तरी
अजूनही, स्पष्टीकरण कुणी कुणास दिले नाही

चढ उतार, रुसवेफुगवे, नात्यात या आले गेले 
ठावूक नाही, हिशोब त्यांचे, कधी मांडले नाही

आहे, खरी गम्मत थोडीशी आणखी छान पुढे
नाचवून,नाचून दोघं, अजून कुणी थकले नाही

https://marathikavita.co.in/index.php?topic=45252.0

©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा