सोमवार, २९ एप्रिल, २०२४

गुंता नात्यांचा २९०४२०२४ yq १७:०९:२३























गुंता नात्यांचा

गुंता नात्यांचा, प्रश्न भारी डोकेदुखीचा
होताच गैरसमज उरे ना कुणी कुणाचा!

सर्व दूरवर त्वरित पसरतो वणवा असा
हरएक उचलतो मौका तेल ओतण्याचा!

खरी गरज जपण्याची हल्ली नात्यांना
मैत्री, ओळख, वा असो संबंध रक्ताचा!

सहाय्य मदत, कशी काय कधी होईल
विसरावा का सर्व अनुभव कोरोनाचा?

सांभाळून घेता आत्मसन्मान आपला
तरीही सुप्त मनी उरतो गुंता नात्यांचा!

©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

शनिवार, २७ एप्रिल, २०२४

घेऊ पाहून

घेऊ पाहून 

तोलतो मला, जो तो आपल्याच नजरेच्या तराजू मधून
नको घाई मित्रानों एवढी जागी माझ्या पहा उभे राहून

सोसले अन् घाव झेलले, अगणित सोनवर्खी हत्यारांचे 
उभा राहिलो सामोर तरीही प्रत्येकाच्या मोकळे हासून

चालायचेच खेळ असे प्राक्तनाचे जुने अन् नवीन सुद्धा
रंग खरे खेळण्यात त्या आपले प्रत्येकाने दिले दाखवून

गोठले, आटले बर्फ जे आत आत धुमसत्या भावनांचे
ठेवले आक्रंदत त्यांना मी कसोटीवर काळाच्या बांधून

टळते वेळ, सरते वेळ घेऊन प्रत्येक वेळी एक हुशारी
होणारे ते होऊन जाईल, त्या त्या वेळी ते घेऊ पाहून

https://marathikavita.co.in/index.php?topic=45256.new#new

©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

गुरुवार, १८ एप्रिल, २०२४

नवी सुरूवात १८०४२०२४ yq १२:४१:२८


























नवी सुरूवात 

नव्या नात्याची नवी सुरूवात...
हरकत नसेल तर हो म्हणूयात?

मला वाटतं, व्हावा एक प्रयत्न
नि:संकोचपणे, दोघं बोलूयात...

तेव्हा नेमकं नवीन होईल काय?
काहीही होवो, कॉफी पिवूयात!

वाटलंच तर, मग हळूवारपणे,
विषयाला सुरूवात करूयात...

मी तर मनापासून खरं सांगतो,
पुन्हा नवीन सुरूवात करूयात...

©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

सोमवार, १५ एप्रिल, २०२४

क्षण सौख्याचे




















क्षण सौख्याचे

तळ्याकाठच्या आठवणी त्या
हल्ली पाठलाग असा का करती ?
उलटून गेलेल्या त्या सांजवेळा
अचानक उगाच पहाटे का स्मरती ?

स्पर्श,गंध, सहवास त्या वेळचा
राहतो रेंगाळत उगाच का भोवती ?
रंगाची उधळण समान भासते 
जातेय गोंधळून म्हणूनी का मती ?

खरे खोटे जरी काहीही असले
तरी देई जगण्या भास ही स्फूर्ती !
पुनरपि यावे, क्षण ते सौख्याचे
चक्रे डोक्यात अताशा का फिरती ?

https://marathikavita.co.in/index.php?topic=45254.new#new
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

रविवार, ७ एप्रिल, २०२४

वादे–बातें ०७०४२०२४ yq ०८:०५:०७

























वादे–बातें

अच्छे अच्छों ने, कई भरौसे दिए
आसानी से उनको तोड़ भी दिए
हमारी अच्छाई, 
उन्हें अच्छों मे गिनते रहें...

करते है, वादे बडे, अक्सर सभी
मानो मतदाता सामने उनके कभी
अपने आप को,
शायद वो नेता समझते रहें...

मित्रों, जानो, समझो दिल टूटता है 
किसी मासूम का तुम्हें जो मानता है
क्यों, हरकतें ऐसी,
बेकार में बारबार करतें रहें...

©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

गुरुवार, ४ एप्रिल, २०२४

नवीन नाही ०४०४२०२४ yq १४:३९:०४

























नवीन नाही 

वेळे नुसार लोक बदलतात...नवीन नाही 
साधून स्वार्थ पसार होतात...नवीन नाही 

इथे रीतच ही खरी आजकाल जगण्याची 
देवून धोका अंतर राखतात...नवीन नाही 

'कामा पुरता मामा न् ताका पुरती आजी' 
जुने जाणते गोष्टी सांगतात...नवीन नाही 

जो तो फक्त इथे वेळेत..वेळेस बांधलेला 
जमेल तेवढी वेळ पाळतात...नवीन नाही

©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९