मंगळवार, ३० जुलै, २०२४

अंतर

























अंतर

आयुष्याला द्यावे उत्तर 
जरी चालले ते समांतर
असून धेय्य एक दोहोंचे 
राखती मधे योग्य अंतर 

राग लोभ तो दोघातला
कमीजास्त होतो निरंतर 
अतूट धागा दोघांमधला
थांबणे ना कुठे क्षणभर

नित्याचीच बाब इथली
सावली कधी ऊन प्रखर
प्रवास हा आखीवरेखीव
म्हणूनी का द्यायचे अंतर

https://marathikavita.co.in/index.php?topic=45272.new#new

©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

सोमवार, २९ जुलै, २०२४

मावळती


























मावळती

शांत एकाकी मावळतीची दिशा
आपल्यातच हरवून गुंग झालेली
म्हणून थोडी हळवी, कातर सुद्धा
एकट्या जीवाला मनी भावलेली

तरल, कुठे गडद घेऊन रंग छटा
एकाकी वाऱ्यावर मंद रेंगाळलेली
होता शांत आत आत दिनकर तो
दावी नभी वेगळी नक्षी मांडलेली

हळवे जरी, अतूट नाते सांजेशी
जाणते रोज गोष्ट मनी साठलेली
उदास न् उल्हसित ती होत जाते
ऐकून अबोल साद मनामनातली

https://marathikavita.co.in/index.php?topic=45271.new#new

©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

रविवार, २८ जुलै, २०२४

अंध सत्य २७०७२०२४ yq ११:२६:३०




























अंध सत्य 

असते का निरोपाची रेषा...? 
कित्येक वाटून घेतलेल्या
नात्यातल्या अंतरांवर?

दृष्टीस पडतात अदृश्य सीमा 
पावलोपावली चालतांना... 
सर्वत्र

निकष आर्थिक नसले तरी
जखडून घेतले आहे,
सर्वांनी धर्म, जात,पंथाच्या
सीमां मधे आणि...

त्यांच्याच रेषांच्या परिघात 
जे आहे, अंध सत्य..! 

ईतर कविता, 27-07-2024 YQ 11:26:30 AM

रविवार, २१ जुलै, २०२४

शेगावचे संत गजानन

























शेगावचे संत गजानन

शेगावीच्या थोर संताचे दर्शन मज झाले
दुख भय मज मनीचे दूर की हो गेले

आजाणूबाहू, उंच सडसडीत काया
प्रकटली मूर्ती घेऊन भक्तीचा पाया
दिगंबरावस्थेत सामान्यांच्या दृष्टीस पडले..१ 

वस्त्र लालसा न् पादत्राणे टाळूनी
शुद्ध ब्रह्म नित्य चालले अनवाणी
जीवनमुक्तांस देहाचे तेव्हा भान ना राहिले..२

कर्म, भक्ती आणखी योगमार्गाने
प्राप्त होई आत्मज्ञान ते सर्वार्थाने
वेळोवेळी ज्ञान देऊनी लोकांना शिकविले..३

गण गण गणात बोते मंत्र सांगूनी
नेक वाट भक्तां सन्मार्गाची दावूनी
ऋषिपंचमी पुण्यदिवशी चैतन्य हे लोपले..४

https://marathikavita.co.in/index.php?topic=45269.new#new

©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

मंगळवार, १६ जुलै, २०२४

जीवन वारी




























जीवन वारी 🚩

माझा विठ्ठल माझी वारी...चाले या संसारी 
कर्मकांड विठ्ठल माझे..श्वासांची उसनवारी 

चालतो अखंड पायी वेडा चाळा रे भक्तीचा 
माया भाबडी अनन्य भक्तीत रचलीस सारी

ओढ लागे भेटीची स्पर्श करण्या त्वा चरणी 
कळे तु वारीत चालता कसे फिरावे माघारी 

आठवे कृपाळू बरसता घन म्हणता सावळा 
अखंड महापूर ओसंडे श्रद्धेचा चंद्रभागे तीरी 

रित्या हाती येऊनी होऊन जातो शिवा तुझा 
कृपा प्रसाद पुरतो तुझा चालता जीवन वारी

https://marathikavita.co.in/index.php?topic=45268.new#new

©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

रविवार, १४ जुलै, २०२४

संजीव




























संजीव

आयुष्यातल्या भावुक वळणावर...भेट तुझी 
नव उमेद जगण्याची देणारी ठरली भेट तुझी 

मनात कोरलेली ती गुंतागुंत का थोडी असते 
सैलावून बंध हळूवार ते घडून गेली भेट तुझी 

उरलो ना मी त्या क्षणी माझा..भारावून गेलो 
मंत्रमुग्ध करून मज मनात रुजली भेट तुझी 

घडून जाता सारे, उरलो नाही कुणाचे कोणी 
उमटवून ठसा आयुष्यावर या गेली भेट तुझी 

कौतुक न केवळ हे, जाणीव मन मनात उरते 
संजीव अगम्य असे...रुजवून गेली भेट तुझी 

https://marathikavita.co.in/index.php?topic=45267.new#new

©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

शुक्रवार, ५ जुलै, २०२४

मानसिकता




























मानसिकता

किती वेळ मौनात राहू काळ काही थांबेना
वेदना अंतरीच्या माझ्या कुणालाही कळेना

तूच हो तुझी रणरागिनी, लढण्यास युद्ध हे
मनोवांछित करून घ्यावी पूर्ण तव कामना

गोठल्यात भावना सगळ्या शतकानुशतके
बंधनातून मुक्त करण्या कुणीही पुढे येईना

स्त्री शिक्षण न् स्त्री मुक्ती, झाले सर्व काही
यत्न केले बहुतांनी, तरीही स्थिती सुधरेना

अत्याचार, बलात्कार विरोधी कायदे, तरी
मानसिकता समाजाची तसूभरही बदलेना

https://marathikavita.co.in/index.php?topic=45266.new#new

©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

सेलिब्रिटीं हो ०५०७२०२४ yq १२:५२:०८

सेलिब्रिटीं हो



बुधवार, ३ जुलै, २०२४

स्वस्त मृत्यू ०३०७२०२४ yq ०३:१४:१०



























स्वस्त मृत्यू

"समृद्धी" वरचे मृत्यू नित्याचेच झाले
चैन, मजा करताना काही पाण्यात गेले,

काही भाग्यवान? तर सत्संगात गेले
स्वस्तात मरावे असे माणसा काय झाले!

नियम सारे तोडून, मरावे लोकांनी
का द्यावी नुकसान भरपाई सरकारने?

तिजोरीवर पडणाऱ्या अति भाराचा 
सवाल करावा कर भरणाऱ्या जनतेने!

वात्रटिका, July 0 3, 2024 YQ 03:14:10 PM